Valentine's Day 2021 Wishes: गुलाबी थंडीच्या मोसमात तुमचे गुलाबी प्रेम व्यक्त करण्याचा अनुभवच काही और आहे आणि हे गुलाबी प्रेम व्यक्त करण्यासाठी 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day ) शिवाय दुसरा चांगला दिवस कुठला असूच शकत नाही. या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी आणि आपले अव्यक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमीयुगुल एकमेकांना छान गिफ्ट देतात. त्यांच्यासाठी खास सरप्राईज अरेंज करतात. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा दिवस घालवतात. अनेक जण या दिवशी एकमेकांना मेसेज, चॅट, च्या माध्यमातून देखील एकमेकांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देतात. त्याचबरोबर प्रत्यक्ष बोलण्यास भीती वाटत असलेले प्रेमवीर मेसेजेसच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली देतात.
यंदाही अनेक प्रेमवीर या व्हॅलेंनटाईन डे निमित्त आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लान करत असतील. त्यासोबत आपल्या जोडीदाराला काय संदेश पाठवावा ज्यानेकरून त्याला किंवा तिला आपल्या मनातील भावना कळतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशांसाठी मराठीतून खास व्हॅलेंटाईन डे दिवसाचे शुभेच्छा संदेश
प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे
प्रेम म्हणजे काय असते हे तुझ्या सहवासात कळाले
तू माझ्या आयुष्यात आल्याने स्वर्गसुख मिळाले
कधी सोडू नकोस साथ माझी
जन्मभर राहिन मी फक्त तुझी!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे
हेदेखील वाचा- Valentine's Day 2021 Gift Ideas: व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या जोडीदारास थोडे हटके गिफ्ट्स देऊन करा सरप्राईज
तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
Happy Valentine's Day
प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता
जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता
प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला
जेव्हा तू मला मिळाला
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे!
तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने
मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार
आज व्हॅलेंटाईन डे दिवशी
करते मी तुझ्या प्रेमाचा स्विकार
Happy Valentine's Day
मग कसे वाटले आमचे शुभेच्छा संदेश? प्रत्येक प्रेमवीराच्या मनाचा विचार करुनच हे खास संदेश बनविण्यात आले आहेत. या शुभेच्छांच्या माध्यमातून तुमच्या प्रिय व्यक्तीस हा दिवस कायम स्मरणात राहिल आणि तुमच्या मनात त्याच्याविषयी असणारी प्रेमरूपी भावना त्याच्यापर्यंत पोहोचेल.