Valentine's Day 2021 Gift Ideas: व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी कपल्स आपल्या प्रिय व्यक्तीसोबत, जोडीदारासोबत हा दिवस साजरा करतात. हा दिवस साजरा करायचा म्हणजे त्यांच्यासाठी गिफ्ट्स घेणे, छान छान सरप्राईज अॅरेंज करणं या गोष्टी ओघाओघाने आल्याच. यंदा अनायसे व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) रविवारच आल्याने सर्व प्रेमीयुगुलांना हा दिवस छान साजरा करता येईल. मग हा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी काही हटके गिफ्ट्स देण्याची तुम्हाला नितांत गरज कारण आहे. इतर दिवशी आपल्या कामात व्यग्र असलेल्यांना यंदा रविवार आल्याने खूप स्पेशल प्लान्स करता येतील.
चॉकलेट्स, बुके यांसारख्या मुलींना आवडणा-या गिफ्टसह काही हटके सरप्राईज प्लानिंग देखील तुम्ही या दिवशी करू शकता.
1. कस्टमाइज्ड किचैन- यामध्ये तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती प्रतिकात्मक किचैन बनवू शकता. वा तुमच्या दोघांचे एकत्र असलेले किचैन देखील बनवू शकता.
View this post on Instagram
2. फोटो फ्रेम: आपल्या जोडीदारासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची फोटो फ्रेम देऊ शकता. यात तुम्हाला सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. मग, घड्याळ, उशी, लाकडाचा स्टँड, पेन यांसारख्या अनेक ठिकाणी तुम्ही या फोटोंचा वापर करु शकता.
View this post on Instagram
3. कस्टमाईज्ड गॅजेट्स
अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी बाजारात असे ब्लूटुथ स्पीकर्स आणले आहेत ज्यावर तुम्ही तुमचे फोटोज देखील लावून तसे बनवून घेऊ शकता. त्यामुळे त्यावर गाणे ऐकताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आठवण येईल.हेदेखील वाचा- Valentine Week 2021 Calendar: रोझ डे ते वेलेंटाइन डे 2021 ची संपूर्ण लिस्ट पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!
View this post on Instagram
4. कॉम्बो सेट- यात तुम्ही आपल्या जोडीदारास गॉगल्स, वॉलेट, किचैन पाऊच, कार की चैन यांसारख्या गोष्टींवर तुमचे आणि त्याच्या नावाची प्लेट बनवून तसे बनवून घेऊ शकता.
View this post on Instagram
5. डिनर डेट
तुमच्या जोडीदारास शांत, रोमांटिक अशा ठिकाणी डिनर डेटला घेऊन जाऊ शकता. व्हॅलेनटाईन डे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरन्ट खास ऑफर्स ठेवतात. ते तुम्हाला इंटरनेटवरुन शोधावे लागेल.
6. नाइट आऊट
तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही मुंबईपेक्षा थोडे दूर अशा निसर्गरम्य ठिकाणी आपल्या जोडीदारास नेऊन हा दिवस सेलिब्रेट करु शकता.
हे थोडे हटके गिफ्ट्स तुम्ही यंदा तुमच्या जोडीदारास दिल्यास तुमचा यावर्षीचा व्हॅलेंटाईन खूप स्पेशल जाऊ शकतो. या व्यतिरिक्त चॉकलेट्स, टेडी बेअर, ज्वेलरी, ड्रेस, गॅजेट्स यांसारखे गिफ्ट्स तर तुम्हाला कायम ऑप्शन आहेतच. मात्र त्यात थोडे वेगळेपणा आणायचा असेल तर हे गिफ्ट तुम्ही नक्की ट्राय करु शकता.