Valentine Week 2021 Calendar PDF: नवीन वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारीच्या सुरुवातीला जोडप्यांसाठी तसेच प्रियकर आणि प्रेयसीसाठी आनंद घेऊन येतो. खास करुन अशा लोकांसाठी जे आपल्या प्रेमाची कबूली देणार आहेत.आता फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचा व्हेलेंटाईन डे खास करायचा असेल तर तयारीला लागा. कारण 14 फेब्रुवारी दिवशी जरी व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जाणार असेल तरीही त्याचं सेलिब्रेशन आठवडाभर आधीपासूनच सुरू होतं. त्यामुळे या सात दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज होण्यासाठी पहा यंदा व्हेलेंटाईन विकमध्ये कोणत्या दिवशी कोणते सेलिब्रेशन असेल.
रोझ डे (Rose Day) पासून सुरू होणारा व्हेलेंटाईन विक आठवड्यातील प्रत्येक एका दिवसासाठी खास असतो. यामध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांसाठी प्रत्येक दिवसाला खास करण्यासाठी स्पेशल सेलिब्रेशनदेखील करतात. मग तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील 'त्या' खास व्यक्तीसाठी हा दिवस स्पेशल करणार असाल तर पहा यंदा कोणत्या दिवशी आहे Rose Day 2020, Kiss Day 2021 ते Propose Day 2021.
यंदा जरी कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे मार्ग बदलेले जाऊ शकतात, परंतु प्रेमाच्या उत्सवाचे आकर्षण कमी होणार नाही. खरं तर, जगभरातील जोडपी आपला प्रियकर किंवा मैत्रीण यांच्यावरील प्रेमाचा आठवडा संस्मरणीय बनविण्यासाठी वेलेंटाईन सप्ताची आतुरतेने वाट पाहतात.व्हॅलेंटाईन सप्ताहाच्या तारख आणि दिवसांबद्दल जर आपण कोणत्याही प्रकारच्या संभ्रमात असाल तर आम्ही तुमच्यासाठी रोज दिन, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डेच्या संपूर्ण तारखा घेऊन आलो आहोत.
Valentine's Day 2021 चं संपूर्ण वेळापत्रक
7 फेब्रुवारी 2021 - रोझ डे
8 फेब्रुवारी 2001 - प्रपोझ डे
9 फेब्रुवारी 2021 - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी 2021 - टेडी डे
11 फेब्रुवारी 2021- प्रॉमिस डे
12 फेब्रुवारी 2001 - हग डे
13 फेब्रुवारी 2021 - किस डे
14 फेब्रुवारी 2021 - व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन्स विक 2021 ची सुरुवात 7 फेब्रुवारी रोजी रोज डे या दिवसापासून होईल. यानंतर 8 फेब्रुवारीला प्रपोज डे, 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल.व्हॅलेंटाईन वीक यादीमध्ये एकूण 8 दिवसांचा समावेश आहे आणि जोडपी प्रत्येक दिवस केवळ एक खास प्रकारे साजरा केला नाही तर तो संस्मरणीय बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही करतो. जर आपणही एखाद्यावर प्रेम करत असाल,परंतु त्यांच्याशी बोलू शकत नसाल तर व्हॅलेंटाईन वीक ची संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका आणि आठवड्यातील प्रत्येक दिवस आपल्या जोडीदाराबरोबर खास पद्धतीने साजरा करून आपल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करा.