Happy Rose Day: फेब्रुवारी महिन्याची सुरूवात होताच प्रेमी युगूलांना वेलंटाईन वीक (Valentine’s Day week) चे वेध लागायला सुरूवात होते. 14 फेब्रुवारीला दरवर्षी वेलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा होत असला तरीही त्यापूर्वी 7 दिवस वेगवेगळे दिवस सेलिब्रेट केले जातात आणि त्याची सुरूवात 7 फेब्रुवारीला रोज डे (Rose Day) पासून होते. रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे अशा खास दिवशी प्रेमी युगूल एकमेकांना त्या दिवसाच्या निमित्ताने खास वस्तू एकमेकांना देतात आणि प्रेमाचा आठवडा सेलिब्रेट करतात. यंदा शनिवार, 7 फेब्रुवारीला रोज डे पासून त्याला सुरूवात होणार आहे. रोझ डे एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. पण यंदा हा रोझ डे तुम्हांला थोडा स्पेशल करायचा असेल तर पहा तुमच्या साथीदारासाठी, प्रिय व्यक्तीसाठी कोणती रोज डे स्पेशल कोणकोणती गिफ्ट्स (Rose Day Gifts) देऊ शकता?
दरम्यान मैत्री ते प्रेम आणि प्रेम ते लग्न असा अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची गुलाबं बाजारात उपलब्ध आहेत. लाल रंग प्रेमाचा म्हणून लाल गुलाब दिलं जातं. तर प्रेमातील पावित्र्याची कबुली देण्यासाठी पांढरा रंगाच्या गुलाबांची निवड केली जाते. तुमच्यातील साथीदाराबद्दल कृतज्ञता, जिव्हाळा याची कबुली देत रोझ डे साजरा करायचा असेल तर गुलाबी रंगाचं गुलाब द्या. निखळ मैत्रीची भावना मोकळी करायची असेल तर पिवळ्या रंगाचं गुलाब द्या. लक्ष वेधून घेणार्या व्यक्तिमत्त्वाला तुमच्या मनातील भावना बोलून दाखवायच्या असतील तर जांभळ्या रंगाची छटा असलेल्या गुलाबाची निवड करा. पॅशन आणि आनंद या दोन्ही भावनांचा मिलाफ म्हणजे नारंगी रंगाचं गुलाब. Valentine's Day Fake Message: काय तुम्हालाही व्हॅलेंटाईन डे गिफ्ट्स मॅसेज येत आहेत? मग ही माहिती नक्की वाचा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान.
रोज डे गिफ्टचे वेगळे पर्याय
प्रिंटेड गुलाब बुके
View this post on Instagram
आता तुम्हांला गुलाबावरच छोटा मेसेज किंवा फोटो देखील प्रिंट करून मिळतो. त्यामुळे केवळ गुलाब देऊन नव्हे तर यंदा त्यावर काही खास लिहून तुमच्या साथीदाराला खूष करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
प्लेटेट गुलाब
View this post on Instagram
गुलाब हे नाशवंत आहे.काही वर्षांनी गुलाब सुकून जाऊ शकतं. पण तुम्हांला रोज डे चं गुलाब कायम ताजं ठेवायचं असेल तर गोल्ड प्लेटेट गुलाबाचा पर्याय तुमच्या आहे. यामध्ये गुलाब तुम्हांला बनवून मिळतं.
ग्रिटिंग्स
गुलाबाच्या माध्यमातून तुमच्या भावना तुम्हांला शब्दांमधून समोरच्या पर्यंत पोहचवायच्या असतील तर ग्रीटिंग्स हा चांगला पर्याय आहे. रोझ डे स्पेशल ग्रिटिंग्स तुम्हांला सहज मिळू शकतात.
परफ्युम्स
रोझ डे अजून थोडा स्पेशल करण्यासाठी रोझ अर्थात गुलाबाच्या सुगंधामधील परफ्युम्सही उपलब्ध आहेत.
स्वीट्स
View this post on Instagram
तुमचा साथीदार गोड खाणारा असेल तर त्याला गुलाबापासून बनवलेल्या अनेक मिठाया देऊन खूष करू शकता.
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डे वीक सुरु होतो ज्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे या दिवसांचा समावेश आहे. तिसऱ्या शतकात ए. डी. सम्राट क्लॉडियस (AD emperor claudius) याने दोन माणसांना मारुन टाकण्याचा आदेश दिला होता. त्या दोघांचेही नाव व्हेलेंटाईन होते. त्यानंतर संत व्हॅलेंटाईनने बहिष्कार केलेल्या कपल्सचे लग्न करुन दिल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आली होती. त्याच्या या बलिदानाची खूप चर्चा झाली आणि मग प्रेमाचा उत्सव सुरु झाला. गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामुळे व्हेलेंटाईन वीकची सुरुवात 'रोज डे 'ने होत असावी.