सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून फसवणुकीचे रोज नवीन प्रकार समोर येऊ लागले आहेत. यातच व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या समाज माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लुबाडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) अनुषंगाने एक मॅसेज व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात एका प्रश्नाचे उत्तर दिल्यास मोबाईल फोनसह अनेक गिफ्ट मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मॅसेज फेक आहे. तसेच नागरिकांनी समाजमध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही फसव्या लिंक बळी पडू नये, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाईल फोन गिफ्ट्स स्कीम, ताज हाँटेल गिफ्ट कार्ड्स स्कीम्स इ. बाबत फसव्या लिंक प्रसारीत होत आहेत. नागरिकांनी अशा फसव्या लिंकला प्रतिसाद देऊ नये, अशा आशयाचे ट्वीट ठाणे शहर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून केले आहे. हे देखील वाचा- Mumbai: कुलाबा येथील मुलीला इन्स्टाग्रामवरील मित्रासोबत मैत्री करणे पडले महागात, घरातून पैशांसह दागिन्यांची केली चोरी
ट्विट-
व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाईल फोन गिफ्ट्स स्कीम, ताज हाँटेल गिफ्ट कार्ड्स स्कीम्स इ. बाबत फसव्या लिंक प्रसारीत होत आहेत. नागरिकांनी अशा फसव्या लिंकला प्रतिसाद देऊ नये. pic.twitter.com/JXtP3mf63c
— Thane City Police (@ThaneCityPolice) February 1, 2021
सायबर गुन्हेगार क्राईमबाबत सरकारकडून नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा दिला जातो. तसेच मोबाईलवर आलेल्या कोणत्याही मॅसेजला बळी न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येते. महत्वाचे म्हणजे, सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. यामुळे अनेकांना लुबाडले गेले आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांकडूनही याची दखल घेतली जात आहे.