Mumbai: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जगभरातील कोणाशी ही मैत्री करता येते. परंतु ही मैत्री कितपत आणि कोणत्या स्तरापर्यंत ठेवावी हे आपल्याला कळले पाहिजे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील कुलाबा (Colaba) येथील एका मुलीला इन्स्टाग्रामवरील एका मुलाशी मैत्री केली. परंतु मैत्री झाल्यानंतर मुलाने मुलीचे घर लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून 19 वर्षीय मुलाला अटक केली आहे.(Mumbai: वरळीत 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाची हत्या, पोलिसांकडून तिघांपैकी एकाला अटक)
सदर आरोपी त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरात कोणीही नसताना आला होता. त्यावेळी त्याने घरातून 14 लाखांचे सोन्याचे दागिने चोरले. हा सर्व प्रकार त्याच्याकडे असलेल्या घराच्या डुप्लिकेट चावीच्या माध्यमातून केला. काही दिवसांपूर्वीच मुलाकडे मुलीने घराची डुप्लिकेट चावी दिली होती आणि ती त्याच्याकडून घेण्यास विसरली होती. शाहिजान अगवान, माझगाव येथे राहणारा हा 19 वर्षीय मुलगा असून त्याच्या विरोधात चोरी करणे आणि घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी असे म्हटले की, 27 जानेवारीला घरातील मंडळी एका टूर वरुन परतली त्यावेळी पैसे, सोन्याचे दागिन्यांसह आयफोनची चोरी झाल्याचे त्यांना कळले. कुलाबा येथील पास्ता लेन येथे ही मंडळी राहतात. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. तेव्हा त्यांनी इमारतीचा सुरक्षा रक्षक, शेजारी आणि काही जणांची याबद्दल चौकशी केली. तसेच घरातील मंडळींना त्यांची कोणती चावी हरवली आहे का ती सुद्धा शोधण्यास सांगितले.(Mumbai: लायटरचा धाक दाखवत मोबाईलच्या दुकानात 85 हजारांची चोरी; एकाला अटक)
यावर त्यांनी त्यांच्या मुलीवर संशय व्यक्त केला. मुलीला याबद्दल विचारले असता तिने भीतीपोटी याबद्दल कोणाला सांगितले नसल्याचे म्हटले. परंतु तिला धीर देत तिच्याकडून सत्य समोर आणले गेले. तिने असे म्हटले की, तिच्याकडील घराची डुप्लिकेट चावी अगवान याच्याकडे राहिली होती. त्याच्यासोबत तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी शाजवान याला अटक केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्याकडे डुप्लिकेट चावी असल्याचे मान्य केले. याच्याकडून 1 लाखांची रोकड आणि आयफोन जप्त केला गेला आहे.