मुंबईतील वरळी (Worli) येथे एका 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाची (Security Guard) हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घटना घडली असून तिघांपैकी एकाला अटक केली आहे. हे तिघे सुद्धा सुरक्षा रक्षकच आहेत. पण त्यामधील एकाला नोकरीवरुन काढून टाकल्याचे पोलिसांनी रविवारी म्हटले आहे. शनिवारी पहाटेच्या वेळेस घडला त्यावेळी एका आरोपीला अटक करण्यात आली.(Mumbai - Pune Expressway Viral Video: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा खुलासा 'चौघांनाही अटक, बंदूक दाखवणारे 'ते' शिवसैनिक नव्हेत')
वरळीत बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी तिन्ही आरोपी दाखल झाले. त्यावेळी पीडित व्यक्तीला त्यांनी खुप वेळा हातोड्याने मारहाण केल्याचे अधिकाऱ्यांना म्हटले आहे. या प्रकारामुळे 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. तर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Yavatmal: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; यवतमाळ येथील घटना)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक 35 वर्षाचा आहे. आरोपीने असे म्हटले की, त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. त्यामुळेच आपल्या दोन साथीदारांसह 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाला आम्ही ठार मारल्याचे त्याने स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कायद्यांअंतर्गत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात साक्ष दिल्याने त्याच्यावर चॉपरने सपासप वार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला होता.