प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Max Pixel)

सेक्स (Sex) दरम्यान पुरुष खूप लवकर उत्तेजित होतात. त्यामुळे लवकरच ते ऑर्गेज्मपर्यंत (Orgasm) पोहोचल्यामुळे त्यांचे शीघ्रपतनही लवकर होते. त्यामुळे त्यांचे शीघ्रपतन लवकर होऊ नये आणि अधिककाळ त्यांना बेडवर ठेवता यावे यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना उत्तेजित होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे दरवेळेस पुरुष जोडीदारास पुढाकार घ्यावा लागतो. मात्र समजा कधी कधी स्त्रियांचा मूड झाला तर त्यांनी पुढाकार घेण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी आपल्या पुरुष जोडीदाराची साथ आपल्याला बेडवर अधिक काळ मिळावी यासाठी स्त्रियांनी बेडवर काही खास गोष्टी करण्याची गरज आहे.

तसे सेक्स दरम्यान स्त्रीचे सौंदर्य पाहताच पुरुष जोडीदार अधिक उत्सुक होतात. त्यांची ही उत्तेजितता रोखून ठेवण्यासाठी त्यांना योग्य वेळी ऑर्गेज्म पर्यंत पोहोचविण्यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

1. अतिघाई करु नका

सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे सेक्सबाबतीत कधीही अतिघाई करु नका. संभोगाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर हळूहळू सुरुवात करा. फोरप्लेपासून या गोष्टीला तुम्ही सुरुवात करु शकता. मिठीत घेणे, अंगाशी खेळणे, चुंबन देणे यांसारख्या गोष्टी तुम्ही बेडवर आपल्या जोडीदारासोबत करु शकता.

2. ऑर्गेज्मपर्यंत पोहोचू देऊ नका

एकदा का पुरुष जोडीदार ऑर्गेज्म पर्यंत पोहोचले तर पुन्हा त्यांना उत्तेजित करण्यासाठी फार वेळ लागतो. त्यामुळे संभोगादरम्यान तुम्ही क्लायमॅक्स पर्यंत आल्यास तिथे थोडसं थांबा. ज्यामुळे पुरुषांचे ऑर्गेज्म रोखून ठेवता येईल. काही वेळाने पुन्हा सुरुवात केल्यास पुरुषांमधील उत्तेजितपणा द्विगुणित होतो.हेदेखील वाचा- Hot Sex Tips: इंटीमसी पासून ऑर्गेज्मिक सेक्स लाईफ मिळविण्यासाठी खास सेक्स टिप्स

3. पेल्विक फ्लोर एक्सरसाइज ट्राय करा

ज्या पुरुषांना शीघ्रपतनाची समस्या असते त्यांनी 3. पेल्विक फ्लोर एक्सरसाइज ट्राय करा. हा व्यायाम सलग 12 आठवडे करा. ज्यामुळे शीघ्रपतनाची समस्या दूर होईल.

4. कंडोमचा वापर करा

गर्भधारणेपासून वाचण्यासाठी कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र पुरुषांना कंडोमचा वापर करणे आवडत नाही. कंडोममुळे सेक्स थोडा वेगळा वाटतो. मात्र तुमच्या पार्टनरला बेडवर दीर्घकाळ धरून ठेवण्यासाठी हा चांगला उपाय आहे. कंडोममुळे पेनिजमध्ये सेंसिटीव्हीटी कमी होती. ज्यामुळे सेक्स सेशन खूप काळ सुरु राहते.

5. सेक्स पोजिशन्स बदलत राहा

सेक्स पोजिशन्स बदलत राहिल्याने ऑर्गेज्मपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. बदलत्या सेक्स पोजिशन्समुळे तुम्ही जास्त काळ बेडवर राहत नाही.

या सर्व गोष्टींमुळे तुमच्या तुमच्या पुरुष पार्टनरला सेक्ससाठी बेडवर जास्त काळ धरून ठेवू शकता. शीघ्रपतन आणि ऑर्गेज्मपर्यंत पुरुष जोडीदार पोहोचले तर तुमचे सेक्स सेशन थोडक्यात संपल्यातच जमा आहे. त्यामुळे बेडवर आपल्या जोडीदारासोबत दीर्घकाळ संभोगाचा अनुभव घ्यायचा असेल तर या गोष्टी नक्की ट्राय करा.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)