व्हर्जिन महिलांना (Virgin Women) पहिल्यांदा सेक्स (Sex) करण्याचा जितका रोमांचक तितकाच वेदनादायक असतो. पहिल्यांदा व्हर्जिनिटी ब्रेक करताना महिलांना थोडासा त्रास नक्की होतो. तसेच थोडा रक्तस्त्रावही होतो. त्यामुळे थोडी वेदना होणे स्वाभाविक आहे. मात्र या वेदनेपासून स्वत:चा बचाव करायचा असेल वा तो त्रास थोडा कमी करायचा असेल तर काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ तुमची व्हर्जिनिटी (Virginity) ब्रेक होत असल्याने हा त्रास तुम्हाला पहिल्यांदा सेक्स करताना अनुभवा लागतो. एकदा का व्हर्जिनिटी ब्रेक झाली तर पुन्हा सेक्स करताना तुम्हाला याचा त्रास होत नाही. अशावेळी पुरुषाचे शिस्न स्त्रीच्या योनीमार्गात अगदी सहजपणे जाते.
फक्त जर महिलांच्या मनात पहिल्यांदा सेक्स करण्याला घेऊन काही भीती असेल, काही शंका असतील, तर पुढे दिलेल्या गोष्टींचा विचार करुन त्यानुसार त्या सेक्सचा आनंद घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान ऑर्गेज्मचा आनंद मिळेल.
1. ल्यूबचा वापर महत्त्वाचा
पहिल्यांदा सेक्स दरम्यान तुम्ही नैसर्गिक ल्यूब अथवा बाजारात मिळणा-या ल्यूबचा वापर करु शकता. यात तुम्ही फोरप्ले देखील प्राधान्य देऊ शकता. ल्यूबच्या चिकटपणामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान त्रास कमी होतो. कंडोममध्ये देखील अशा प्रकारचे ल्यूब असते ज्यामुळे पुरुष अनेकदा कंडोमचा वापर करतात.हेदेखील वाचा- Sex Tips: सेक्स दरम्यान चुकूनही कधी 'या' गोष्टींचा ल्यूब म्हणून करु नका वापर
2. थोड्या वेदना होणार याची मानसिक तयारी ठेवा
पहिल्यांदा सेक्स म्हटलं की पुरुषांपेक्षा स्त्रियांना थोड्या वेदना होणार याची तयारी करा. ज्यामुळे सेक्स दरम्यान काही विचित्र वाटणार नाही. त्यामुळे सेक्स पद्धतींचा योग्य रितीने वापर करा.
3. हायमन ब्रेक झाल्यानंतर Bleeding होऊ शकते
पहिल्यांदा सेक्स करताना स्त्रियांचे हायमन फाटत असल्यामुळे रक्तस्त्राव होतो. मात्र अनेक स्त्रिया इतके ब्लिड नाही करत जितकं त्यांना वाटत असते. काळजी करण्याचे काही कारण नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे असे समजून सेक्सचा आनंद घ्या.
4. पहिल्यांदा ऑर्गेज्म
तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असताना तुम्हाला ऑर्गेज्मचा अनुभव येईलच असे नाही. पहिल्यांदा सेक्स हा अनुभवच तुमच्यासाठी वेगळा आणि नवीन असतो. त्यामुळे ऑर्गेज्मचा आनंद मिळेलच असे नाही.
5. काही दिवस सलग ब्लिडिंग होऊ शकते
पहिल्यांदा सेक्स करत असल्याने अनेक महिलांना सलग काही दिवस ब्लिडिंग होऊ शकते. मात्र यामुळे घाबरून न जाता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
व्हर्जिन महिलांसाठी पहिल्यांदा सेक्स करण्याचा अनुभव हा जितका थ्रिलिंग असतो तितकाच थोडासा वेदनादायी असतो. मात्र यात तुमच्या जोडीदाराने तुम्हाला योग्य ती साथ दिल्यास तुमचा हा त्रासही कमी होऊ शकतो.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)