Kiss Tips: जोडीदाराचे चुंबन घेताना टाळा या '5' गोष्टी अन्यथा होऊ शकतो हिरमोड
French Kiss (Photo Credits: Wikimedia Commons)

प्रत्येक कपल्ससाठी एकमेकांच्या जवळ येण्यासाठी मिळालेला क्षण हा आनंदाचा आणि नेहमीच आठवणीत राहणारा ठरतो. पहिल्यांदाच जर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला किस केले असेल त्याचा अनुभव तुमच्यासाठी एकदमच खास असेल. कारण पहिल्या किस नंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटातील रोमँटिक सीन प्रमाणे काही गोष्टी घडल्यासारखे वाटले. पण जर तुम्ही प्रथमच किंवा तुम्हा दोघांना एकांत मिळाल्यास पार्टनरला किस करण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. अन्यथा त्याचे परिणाम काही वेगळे सुद्धा होऊ शकता.

आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला आपण खुश ठेवण्यासाठी सर्व काही गोष्टी करतो. पण त्याचसोबत पार्टनरला मानसिक आणि भावनिक आधार असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कपल्सला ज्या वेळी एकांत मिळतो त्यावेळी ते एकमेकांच्या जवळ येऊन ते सेक्सची करण्याचे सुद्धा ठरवतात. पण या वेळी जर तुम्ही सेक्सची सुरुवात किसिंग पासून करणार असल्यास काही गोष्टींकडे जरुर लक्ष द्या.(First Night Sex Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री करू नका या '5' चुका अन्यथा आयुष्यभरासाठी सेक्स लाईफवर होऊ शकतो परिणाम)

>>अतिउत्साही असल्यासारखे वागू नका

पार्टनरला किस करताना नेहमीच लक्षात ठेवा की तुम्ही अतिउत्साही असल्याचे भासवून देऊ नका. कारण अतिउत्साहात आपण पार्टनरला जेव्हा किस करतो त्यावेळी एकमेकाचे Lips Suck करताना आपण ते किती वेगाने आणि जोराने करत आहोत ते कळून येत नाही. पार्टनरला किस करण्याचा उत्साह असावा पण तो अधिक प्रमाणात नसेल तर बरेच आहे.

>>जोडीदाराला बळजबरी करू नका

किस करण्यापूर्वी पार्टनरचा मूड कसा आहे ते जाणून घ्या. तसेच पार्टनरला तुम्हाला किस करण्याचा मूड नसेल तर त्यासाठी त्याला बळजबरी करु नका. त्यामुळे नात्यात या कारणावरुन भांडण होऊ शकते. पण जर किस करण्यासाठी तुम्ही दोघे ही तयार असल्यास ते करण्यास काहीही हरकत नाही.

>>पार्टनरवर छाप पाडण्यासाठी किसचा पर्याय निवडू नका

आपण ज्यावेळी रिलेशनशिप मध्ये असतो त्यावेळी पार्टनर आपल्याला त्याच्या रॉमँटिक पद्धतीने आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही पार्टनरवर आपली छाप पाडण्यासाठी किसिंगचा पर्याय निवडत असला तर विचार बदला. कारण बहुतांश मुलींना रिलेशनशिपमध्ये मुलांकडून काही अपेक्षा असतात. त्यामुळे जर तिच्या अपेक्षा भंग झाल्यास तिच्यासह तुमचा सुद्धा हिरमोड होऊ शकतो.

>>किस करताना दुसरीकडे पाहणे शक्यतो टाळा

आपण पाहतो बहुतांश कपल्स हे समुद्राच्या ठिकाणी किंवा घरात जरी एकटे असताना पार्टनरला अलगद जवळ घेत किस करतात. परंतु जेव्हा तुम्ही पार्टनरला किस करत असाल त्यावेळी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाहणे टाळा. नाहीतर पार्टनरला तुम्ही किस करताना तो मनापासून करत नसल्याची सुद्धा भावना निर्माण होऊ शकते.

तर वरील काही टीप्स पार्टनरला किस करताना जरुर लक्षात ठेवा. तसेच पार्टनरला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. जेणेकरुन तुमचे नाते एकमेकांना समजून घेतल्यास अधिक काळ टिकण्याची शक्यता अधिक असते.