First Night Sex Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री करू नका या '5' चुका अन्यथा आयुष्यभरासाठी सेक्स लाईफवर होऊ शकतो परिणाम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

लग्नबंधनात अडकणारी प्रत्येक जोडपी जेवढी आपल्या लग्नाला घेऊन उत्साहात असतात तितकीच ती आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या सेक्सला (First Night Se Tips) घऊन Excited असतात. लव्हमॅरेज (Love Marriage) असो अरेंज मॅरेज (Arrange Marriage) लग्नाची पहिली रात्र ही प्रत्येकासाठी खास असते. त्यासाठी प्रत्येकाने काही खास प्लान्स आखलेले असतात. तर काहींच्या मनात भीती असते. ही भीती दूर करण्यासाठी पहिल्या रात्री जोडप्यांनी काही ठराविक गोष्टी करणे तर काही गोष्टी टाळणे फार गरजेचे आहे. असे न केल्यास आयुष्यभरासाठी तुमच्या सेक्स लाईफवर (Sex Life)  आणि नकळतपणे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

यासाठी स्त्रियांनी आणि विशेष करुन पुरुषांनी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्या रात्रीची उत्सुकता सर्वांनाच असते. मात्र त्यासाठी आपण प्लान केलेल्या सर्व गोष्टी ह्या पहिल्याच रात्री झाल्या पाहिजे असे गृहित धरू नका. त्यासाठी आधी एकमेकांशी छान संवाद साधून मनमोकळं करा आणि सेक्स बद्दलच्या एकमेकांच्या मनात काय विचार आहेत, काय भावना आहेत हे जाणून घ्या. अतिउत्साहीपणा तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम करु नये असे तुम्हाला वाटत असेल तर पुढील गोष्टी पहिल्या रात्री करण्याचा चुकूनही विचार करु नका.

1. फोरप्ले न करता सेक्सला सुरुवात करणे.

पहिल्या रात्रीचा तुमच्यातील आर्ततायीपणा तुम्ही फोरप्ले न करता तुमच्या जोडीदारास दिसू शकतो. त्यासाठी एकमेकांशी बोलून छान दीर्घकाळ फोरप्लेचा आनंद घेत सेक्सला सुरुवात करा. जरी तुम्ही फोरप्ले न करता सेक्सला सुरुवात केली तर तुम्ही वासनाधीन आहात असा समज तुमच्या जोडीदाराच्या मनात निर्माण होईल.

2. महिला जोडीदाराच्या शरीर पाहण्यासाठी तिच्या शरीराशी दुर्व्यवहार करू नका.

महिलांच्या बॉडा पार्ट आणि आकर्षक बांध्यामुळे प्रत्येक पुरुषाची पहिल्या रात्री ते सर्व भाग पाहण्याची उत्सुकता असते. त्यासाठी महिलेला न्यूड अवस्थेत पाहण्यासाठी आसुलेले असतात. मात्र असं करत असताना तुम्ही अतिघाई केलात तर महिलेला वाटेल तुम्ही तिच्याकडे स्त्री म्हणून न पाहता एक वस्तू म्हणून पाहत आहात जी उघड करण्यातच तुम्हाला आनंद आहे.

3. सेक्स अनुभवाबाबत तुम्हाला अतिज्ञान आहे असा आर्विभाव आणू नका.

जर तुम्हाला याआधी सेक्सचा अनुभव असेल अथवा नसेल तर तो तुमच्या जोडीदारास सांगताना जास्त आर्विभाव आणू नका. महिलांना अशा गोष्टी आवडत नाही वा आपला जोडीदार आपल्याला कमी लेखत आहे असा त्यांचा समज होईल. Shower Sex Positions: शॉवर सेक्स करताना 'या' हॉट पोजिशन्स ट्राय करुन पाहा, पार्टनरच्या तोंंडून नक्की निघेल Oh Yeah!

4. महिलांना वारंवार Orgasm पर्यंत पोहोचले आहे की नाही हे विचारू नका

पुरुषांना खूप घाई असते की आपण आपल्या पत्नीला orgasm पर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो आहोत की नाही. मात्र असे वारंवार विचारत राहिल्यास महिलांना त्या गोष्टी आवडत नाही. त्यामुळे आधी फोरप्ले चा आनंद घ्या. मग हळूहळू सेक्सचा अनुभव घ्या.

5. पॉर्न फिल्मचा पहिल्या रात्री धाडसी अनुभव घेण्यास जाऊ नका.

जर तुम्ही पहिल्या रात्रीसाठी लग्नाआधी काही पॉर्न फिल्म बघितल्या असतील तर त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री करायच्या आहेत हा हट्ट सोडून द्या. कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीकडे एक पत्नी म्हणून नाही तर पॉर्नस्टार म्हणून पाहत आहात असा समज होईल. तसेच महिलांनी पॉर्न फिल्ममधल्या सर्व गोष्टी करण्यास मागे लागू नका.

लग्नाची पहिली रात्र आणि त्यादरम्यान आलेलेल शरीर संबंध हे खूप खास असतात. महिलांची व्हर्जिनिटी ब्रेक होण्याचा अनुभव महिलांसाठी जितका कुतूहलाचा विषय तितकाच चिंतेचा विषय असतो. म्हणून महिला जोडीदाराशी एका पत्नीप्रमाणे ट्रीट करुन छान रोमँटिक आणि आयुष्यभर आठवणीत राहिल असा सेक्सचा अनुभव त्यांना पहिल्या रात्री देणे फार गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे सेक्स लाईफ सह तुमचे वैवाहिक आयुष्य देखील सुरळीत राहिल.