Kiss Day 2020 Gift Ideas: प्रेमिकांच्या दुनियेतील महत्त्वाचा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन विक (Valentine Week). रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day), चॉकलेट डे (Chocolate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Promise Day), हग डे (Hug Day), किस डे (Kiss Day) आणि व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) अशा विविध नावांनी साजरा केल्या जाणाऱ्या या आठवड्यात प्रत्येक दिवसाचे असे खास महत्त्व आहे. या सात दिवसांपैकीच एक म्हणजेच किस डे. तुम्हीही व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा करत असाल तर, खास आपल्यासाठी या काही किस डे गिफ्ट. खाली दिल्यानुसार विविध प्रकारे किस करुन आपण आपल्या पार्टनरला किस डे निमित्त खास गिफ्ट देऊ शकता.
हलकासा किस: आपल्या पार्टनरचा अंदाज घेण्यासाठी आणि त्याला प्रेमातील पुढच्या टप्प्याची जाणीव करुन देण्यासाठी हलकासा किस अनेकदा कामी येतो. आपल्या पार्टनरच्या गालावर, कपाळावर, मानेवर, हातावर किंवा तुम्हाला त्याच्या आवडणाऱ्या कोणत्याही अवयवाचे किंवा अंगाचे तुम्ही चुंबन घेऊ शकता. या चुंबन प्रकारात आपले ओठ समोरच्या व्यक्तीच्या शरीरावर हलकेसे टेकवायचे असतात. ज्यात भावनांचाही समावेश असेल.
थेट चुंबन: खरे तर जवळपास सर्वच कपल्समध्ये हा चुंबन प्रकार तसा सर्वसामान्य आहे. या चुंबन प्रकारात आपले ओठ पार्टनरच्या ओठांवर टेकवून एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो.
श्वास अनुभवणारा किस (Feeling-Breath): फिलींग बर्थ म्हणजेच श्वास अनुभवणारा किस घेतही तुम्ही आपल्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन विकमध्ये किस डेचे खास गिफ्ट देऊ शकतात. या किस प्रकारात कपल्स एकमेकांच्या तोंडात आपली जीभ ढकलतात आणि चुंबण घेतात. या वेळी एकमेकांचे श्वासही एकमेकांमध्ये मिसळले जातात.
लिप-लॉक (Lip-Lock Kiss): कपल्समध्ये प्रदीर्घकाळ एकोपा असल्याशिवाय शक्यतो असा किस अनुभवला जात नाही. या किस प्रकारात कपल्स एकमेकांना चुंबन घेताना एकमेकांचे ओठ लॉक करतात. तसेच दोघेही एकमेकांना घट्टपणाने आपल्या बाहुपाशात घेतात.
Suck किस: आगोदरच एकमेकांच्या प्रेमात असलेल्या प्रेमी युगुलाला जर अधिकच प्रेमाची अनुभुती घ्यायची असेल तर तुम्ही Suck Kiss अनुभवू शकता. या किस प्रकारात एकमेकांचे तोंड विरुद्ध बाजूला खेचले जाते.
स्ट्राबेरी किस (Strawberry Kiss): हा किस प्रकार म्हणजे केवळ रोमँटीक कल्पना आहे. कपल्समधील एक पार्टनर आपल्या ओठांमध्ये स्ट्रॉबेरी पकडतो आणि दुसऱ्या पार्टनरला तीच स्ट्रॉबेरी दुसऱ्या बाजूने खात किस घेण्यास सांगतो. (हेही वाचा, Valentine Week 2020: व्हॅलेंटाईन विकमधील प्रत्येक दिवसाचं काय आहे महत्त्व? का साजरा करतात रोज, प्रपोज, चॉकलेट, टेडी, प्रॉमिस, हग, किस डे?)
फ्रेंच किस (French-Kiss): फ्रेंच किस हे नाव अनेकांनी ऐकले तर काहींनी अनुभवले असेल. हा किस प्रकार तसा बराचसा कठीण आणि म्हटला तर सोपा आहे. या किस प्रकारात दोन्ही पार्टनर कंम्फर्टेबल असावे लागतात. जेणेकरुन हा किस करण्यासोबतच अनुभवता येईल. या किस प्रकारात ओठ आणि जीभ या दोन्ही अवयवांचा वापर केला जातो. हा किस करताना पार्टनर उत्तेजीत होण्याची शक्यता असते.
फॉर हेड किस (Forehead-Kiss): किस करताना अनेकदा आपल्या पार्टनरच्या तोंडाला तोंड लावण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या पार्टनरच्या कपाळावर हलकेसे चुंबन घेऊनही त्याला किस डे निमित्त खास गिफ्ट देऊ शकता.
नोजी-नोजी किस (Nose-Kiss): किस प्रकारामध्ये काहीतरी हटके करण्याचा विचार करणाऱ्या कपलसाठी हा पर्याय चांगला आहे. नाजी नोजी किस प्रकारात पार्टनर एकमेकांच्या नाकावर नाक रगडतात आणि डीप माऊथ चुंबनही घेतात.
अल्टीमेट किस: जर तुम्ही आपल्या रिलेशनमध्ये शेवटच्या टोकाला पोहोचला असाल तर आपल्यासाठी हा किस प्रकार चांगला आहे. पण हा किस प्रकार तुम्हाला उघड्यावर करता येणार नाही. अनेकदा कपल्स सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले प्रकारात या किसचा वापर करतात. या किस प्रकारात पार्टनरच्या सर्वांगाला किस करत सुटतो. पण, हा किस घेण्यासाठी पार्टनरची पूर्वसंमती असणे अत्यं महत्त्वाचे आहे. ती नसेल तर, तुम्ही वरील पैकी 9 चुंबन प्रकार नक्कीच वापरु शकता.
दरम्यान, व्हॅलेंटाईन सप्ताहातील शेवटून दूसरा असतो तो किस डे. या दिवशी कपल एका वेगळ्याच उंचीवर असते. कपल एकमेकांना किस करते. एकमेकांप्रती असलेल्या भावाना या दिवशी अधिक उत्तेजीतपणे व्यक्त केल्या जातात. या भावना व्यक्त करण्यास किस महत्त्वाची भूमिका निभावतो. अर्थात पार्टनरची संमती असेल तर किस करण्यासाठी पार्टनर वेळ घालवत नाही.