Condom | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

गर्भधारणा (Pregnancy) टाळण्यासाठी अनेक जोडपी सेक्स दरम्यान कंडोम (Condom) चा वापरतात. कारण सुरक्षित सेक्स (Sex) करण्याचा एक उत्तम उपाय म्हणून 'कंडोम' कडे पाहिले जाते. अनेक अविवाहित जोडपी किंबहुना विवाहित जोडपी कंडोमचा वापर करतात. मात्र अनेकदा अति उत्साहामुळे अनेक जोडप्यांकडून सेक्स पूर्वी कंडोमची Expiry Date पाहणे राहून जाते. ज्याचे सेक्सदरम्यान वा सेक्स नंतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अशा वेळी प्रत्येक जोडप्यांनी कंडोमचा कालबाह्य होण्याची तारीख पाहणे फार गरजेचे आहे. कारण सेक्स दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे कंडोम जर कालबाह्य झालेले असेल तर त्यामुळे होणारे परिणाम देखील तितकेच गंभीर असतात.

कंडोममुळे गर्भधारणा टाळता येते हे आपल्या सर्वांना माहितच आहे. मात्र जर तेच कंडोम कालबाह्य झालेले असेल तर सेक्सदरम्यान ते फाटण्याची शक्यता असते आणि गर्भधारणा होऊ शकते. या व्यतिरिक्त कालबाह्य झालेले कंडोम वापरण्याचे दुष्परिणाम काय असतात हे लक्षात घ्या.

1. सेक्सदरम्यान कंडोम फाटले तर तुम्हाला वा तुमच्या पार्टनरला आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

2. कालबाह्य झालेल्या कंडोमचा प्रभाव अतिशय कमी असतो. कारण एक्सपायर झालेलं कंडोम कोरडे आणि कमकुवत होत जातं. Sex Positions: सेक्स रुटीन मध्ये थोडा ट्विस्ट आणतील अशा 'या' हॉट पोजिशन्स Multiple Orgasms साठी आहेत अगदी बेस्ट पर्याय

3. कंडोम एक्सपायर होऊन बरेच दिवस उलटले असतील तर त्याचा वापर करू नये. कारण यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारे संरक्षण मिळणार नाही.

4. एका कंडोमची एक्सपायरी डेट साधारणत: तीन ते पाच वर्ष एवढी असते. तर कधी कधी कंडोम वापरण्याची मुदत त्यांच्या ब्रँड कंपनीनुसार वेगवेगळी असते.

महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कंडोम कशा पद्धतीनं सांभाळून ठेवत आहात, यावरही स्वच्छता(Hygiene) तसंच सुरक्षिततेसंदर्भातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

यामुळे स्वच्छ आणि योग्य ठिकाणी कंडोम न ठेवल्यास ते अतिशय कोरडे किंवा अतिशय चिकट होतात. अशा कंडोमचा वापर करणं टाळा. कंडोम कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. यामुळे जर तुम्हाला सेक्सचा चांगला अनुभव घ्यायचा असेल तर कंडोम वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट अवश्य पाहा.