रोज सेक्स (Sex) करणे सुरक्षित आहे की नाही याबाबत अनेक जोडप्यांमध्ये शंका असते किंवा आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे आपला पार्टनरला त्याचा त्रास होऊ नये ही एकच भीती जोडप्यांना सतत सतावत असते. रोजच्या धावपळीच्या जीवनात रोज सेक्स करणे शक्य होत नाही. कारण दिवसभराच्या धावपळीमुळे शरीर इतके थकून गेले असते की शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्राणच उरत नाही. त्यासाठी तुमचे शरीर सदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या आहारात काही ठराविक गोष्टींचा समावेश असला पाहिजे. मात्र रोज सेक्स केल्याने देखील तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होतात असे सांगितले तर? तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. रोज सेक्स केल्याने देखील तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होतात.
रोज सेक्स केल्याने तुमच्या शरीरावर हितवर्धक आणि आरोग्यदायी असे फायदे होतात. यामुळे तुमच्या नात्यात आलेला दुरावा देखील कमी होण्यास मदत होते. हे नेमके फायदे कोणते याविषयी जाणून घेऊया सविस्तर
1. सेक्समुळे जोडप्यांमधील संभाषण वाढते
सेक्सदरम्यान तुमच्यातील संभाषण वाढते. तुम्हाला बेडवर काय गोष्टी आवडतात किंवा आवडत नाही. याबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलता.
2. तणावमुक्त करते
रोज सेक्स केल्याने तुमच्या मनावर कसले तणाव असेल तर ते कमी करण्यास वा दूर करण्यास मदत होते. सेक्स केल्याने एंडोर्फिन, डोपामाइन आणि ऑक्सीटोसिन रिलीज होतो जो तणावाचा स्तर कमी करण्यास मदत करतो. यामुळे तुमचा मुडही चांगला होतो.हेदेखील वाचा- Sex Tips: संभोगानंतर 'या' 5 गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा सेक्स लाईफवर होईल परिणाम
3. आत्मविश्वास वाढवतो
जर तुम्हाला तुमच्या शरीररचनेबद्दल किंवा तुमच्या लुक्स ला घेऊन काही चिंता असेल तर सेक्सदरम्यान तुम्ही या विचारांपासून दूर राहता. कारण अशा वेळी तुमच्याशी कुणीतरी जवळीक साधावी असे तुम्हाला वाटत असते. त्यावेळी सेक्स करणे खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या शरीराबद्दल वाटणारी चिंता दूर होते.
4. चांगली झोप लागते
रोज सेक्स केल्याने मन:शांति मिळते. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. सेक्समध्ये तुम्ही मनावरील तणाव कमी होतो ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
5. सेक्समुळे तुमचे वय कमी झाल्याचा अनुभव येतो
एंडोर्फिन रिलीज झाल्याने तुमची त्वचा तजेलदार बनते. त्यामुळे झोप चांगली लागत असल्याने चेह-यावर आलेले काळे डाग, सुरकुत्या कमी होतात.
रोज सेक्स केल्याने जोडप्यांमधील दुरावा कमी होते, नाते आणखी घट्ट बनते. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासही कमी होतो. झोप चांगली लागते. याचाच अर्थ रोज सेक्स केल्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही फायदे होतात. मात्र हे सर्व करताना आजूबाजूच्या परिस्थितीची काळजी घ्या.