Sex Tips: संभोगानंतर 'या' 5 गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा सेक्स लाईफवर होईल परिणाम
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) हा प्रत्येक जोडप्याच्या नात्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. अनेकदा तर यावर तुमचे वैवाहिक आयुष्य कसे असेल हे ठरते. तुमच्या नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी तुम्ही सेक्स लाईफ चांगली एन्जॉय करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेक्सदरम्यान काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे तितकीच काळजी सेक्सनंतरही घेणे गरजेचे आहे. सेक्स झाल्यानंतर तुमच्या शरीराच्या हालचाली योग्य असणे गरजेचे असते. कारण सेक्स नंतर तुमचे शरीर अगदी थकून जाते. अशा वेळी दोघांच्याही शरीरात प्रचंड थकवा निर्माण होतो. त्यामुळे सेक्स नंतर तुमची संपूर्ण बॉडी रिलॅक्स होणे गरजेचे आहे.

यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही चुकूनही दुर्लक्षित करुन चालणार नाही. कारण त्याचा परिणा तुमचा सेक्स लाईफवर होऊ शकतो. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही सेक्सनंतर टाळल्या पाहिजेत.

1. सेक्सनंतर मूत्रविर्सजन न करणे: सेक्सनंतर महिला वा पुरुष मूत्रविर्सजनाला जाणे टाळतात. शरीर थकल्यामुळे ते लघवीला जाण्याचा कंटाळा करतात. मात्र असे करु नका. कारण सेक्स दरम्यान कोणते विषाणू वा किटाणू शरीरात गेले असतील तर लघवीद्वारे बाहेर पडतात. म्हणून मूत्रविर्सजनाला जाणे गरजेचे आहे.हेदेखील वाचा- Standing Sex Position Tips: स्टँडिंग सेक्स पोजिशन पुरेपूर आनंद घेण्यासाठी 'या' टिप्स येतील कामी

2. आपल्या गुप्तांगांवर ओल्या वाइप्सचा उपयोग करणे: सेक्सनंतर आपल्या योनीमार्गाची स्वच्छता गरजेची आहे. मात्र त्यासाठी महिलांनी सेक्सनंतर ओल्या वाइप्सचा वापर टाळावा. कारण त्यात केमिकल असतात.

3. गुप्तांगावर साबणाचा उपयोग करणे: योनीभागावर साबण लावल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्याकडून नैसर्गिक मॉइस्चरायजरशी छेडछाड होऊ शकते. वजाइनल भाग खूपच संवेदनशील असतो. त्यामुळे सेक्सनंतर वजाइनल भागाला साबण लावू नये.

4. लिंगरी (अंर्तवस्त्रे) घालून झोपणे: सेक्स नंतर अंर्तवस्त्र घालून झोपल्यावर कपड्यांच्या संपर्कात आल्याने त्याचा गुप्तांगावर परिणाम होऊ शकतो. म्हणून सेक्सनंतर शक्यतो अंर्तवस्त्रे घालून झोपू नये.

5. सेक्सनंतर हॉट बाथ टब शॉवर: सेक्सनंतर गरम पाण्याच्या टबात हॉट बाथ घेणे चुकीचे आहे. कारण सेक्सदरम्यान तुमचा वजाइना जास्त प्रमाणात उघडला जातो. अशा वेळी पाणी आत जाऊन तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते.

यामुळे सेक्सचा अनुभव दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सेक्सनंतर या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. कारण यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर विपरित परिणाम होऊ शकतो.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)