Sexual Relationship | Representational Picture (Photo Credits: Pixabay)

गर्भावस्थेमध्ये शरीरसंबंध म्हणजेच सेक्स करावा की नाही याबाबत अनेक जोडप्यांच्या मनात समज-गैरसमज असतात. त्यामुळे कधी कधी जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होते, नात्यात कटूता येते. तर कधी काही जोडपी गंभीर चुका करुन बसतात. त्यामुळे गर्भावस्थेत सेक्स करावा की नाही याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे (Dos and Don'ts of Having Sex During Pregnancy) अतिशय महत्त्वाचे ठरते. कधी कधी चुकीच्या पद्धतीने सेक्स केल्याने गर्भाशयातील गर्भालाच धक्का लागू शकतो. असे अनेक धोके असले तरी गर्भावस्थेमध्ये सेक्स करण्याचे काही फायदे देखील आहेत. त्यामुळे गर्भावस्थेतील सेक्स करणे न करणे यातील फायदे तोटे अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

वेगवेगळ्या पोझ निवडा

गर्भावस्थेमध्ये सेक्स शक्यतो टाळावा. पण जर करणारच असाल तर वेगवेगळ्या पोझ ट्राय करा आणि त्यातील सर्वात कमी धोकादायक पोझ निवडा. जेणे करुन जोडीदाराला आनंदही मिळेल आणि सुरक्षीतताही वाढेल. अशा वेळी स्पूनिंग सेक्स पोझीशन आजमावता येऊ शकते. (हेही वाचा, Best Sex Positions: जोडीदारासोबत सुंदर सेक्स लाईफसाठी अनुभवा खास सेक्स पोझिशन)

चांगल्या प्रतिचे वंगण

गर्भावस्थेमध्ये सेक्स करणाऱ्या जोडप्यांनी चांगल्या प्रतिचे वंगण म्हणजे ल्यूब वापरणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकाची इजा होणार नाही. गुप्तांगामध्ये नैसर्गिक रित्या वंगन निर्माण होत असले तरी गर्भावस्थेमध्ये अशा प्रकारचे वंगण बाहेरुन वापरणे आवश्यक ठरते. त्यातही पाणीदार वंगण अधिक प्रभावी ठरते. खास करुन पेट्रोलियम बेस्ड ल्यूबचा वापर टाळावा.

धोकादायक गर्भावस्थेत सेक्स टाळा

कधी कधी गर्भधारणेतच समस्य असतात. त्यामुळे अनेक वैद्यकीय उपाचर आणि उपाययोजना करुन गर्भाधारणा झालेली असते. काही प्रकरणांमध्ये नैसर्गिक गर्भधारणा असली तरी गर्भाची आणि गर्भार महिलेची शारीरिक स्थिती नाजूक असते. अशा वेळी सेक्स करणे कधीही टाळणे. अशा अवस्थेत सेक्स टाळणे गर्भाशयातील गर्भासाठी आणि जोडीदाराच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे ठरते.

नात्यातील तणाव दूर करण्यासाठी सेक्स फायदेशीर

गर्भावस्थेतील स्त्रीच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या असतात. त्यातच तिचा जोडीदार लैंगिक सूख न मिळाल्याने अतृप्त असतो. त्यामुळे दोघांच्या समस्या वेगवेगळ्या असल्या तरी चिडचीड होऊन नात्यात दूरावा येऊ शकतो. दूरावा येण्याची इतरही काही कारणे जरूर असू शकतात. अशा वेळी हा दुरावा कमी करण्यासाठी गर्भावस्थेतही सेक्स प्रभावी ठरु शकतो.

दरम्यान, गर्भावस्थेत सेक्स करताना दोघापैकी एकाची तयारी असून चालत नाही. जोडीदारही मनापासून तयार असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे जर दोन्ही बाजंनी संमती असेल तरच गर्भावस्थेत सेक्स करण्याचा पर्याय निवडा. अन्यथा त्या वाटेला जाणे शक्यतो टाळा.

(टीप: वरील लेखात दिलेली सर्व माहिती केवळ वाचकांच्या ज्ञनात भर इतक्या माफक हेतूने दिली आहे. माहिती वाचून कृती करण्यापूर्वी वैद्यकीय आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक. वरील माहितीतील अचूकता, सत्यता अथवा कोणत्याही परिणामांची खात्री देता येत नाही. त्यामुळे लेखातील मजकूराबद्दल प्रत्येकाची मते ज्याच्या त्याच्या आकलनानुसार वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे वरील लेखाची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)