Sex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का? काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Sex During Coronavirus: कोरोना काळात ऑनलाईन सर्वात जास्त वेळा सर्च केला गेलेला प्रश्न म्हणजे सेक्स केल्याने कोरोना पसरतो का? ही शंंका निर्माण होण्याचंं मुख्य कारण म्हणजे एकीकडे कोरोनापासुन बचावासाठी दिला जाणारा सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे शारिरिक अंतर पाळा आणि त्यात सेक्स म्हंंटला की शारिरिक जवळीक आलीच मग अशावेळी या जवळीकीतुन कोरोना पसरु शकतो का असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर याचं उत्तर म्हणजे, सेक्स केल्याने म्हणजेच पेनिट्रेशन मुळे किंंवा वीर्यातुन कोरोनाचे विषाणु पसरत नाहीत, किंंबहुना असे कोणतेही उदाहरण अद्याप तरी समोर आलेले नाही. मात्र दुसरीकडे कोरोना पसरण्याचे मुख्य स्त्रोत थुंंकी आणि लाळ असते, त्यामुळे फोरप्ले (किसिंग) मुळे हे विषाणु पसरण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत सेक्स करणे पुर्णतः टाळण्याची गरज नाही मात्र सेक्स पोझिशन (Sex Positions) मध्ये आणि प्रक्रियेत काही बदल करुन तुम्ही सेक्सची मजा अनुभवु शकता. Sex In Coronavirus: कोरोना काळात एकत्र न राहणार्‍या कपल्सने भेटल्यावर सेक्स करताना काय काळजी घ्यावी?

कोरोना काळात सेक्स करताना काय काळजी घ्यावी?

-साधारणतः सेक्स करताना अधिक फोरप्ले करावा असा सल्ला सगळे देतात यामुळे दोघांंमध्येही उत्तेजना निर्माण होतात आणि पुढे एक हॉट सेक्स सेशन अनुभवता येते, मात्र कोरोना काळात आम्ही असे सांंगु की फोरप्लेची वेळ कमी करा. वाटल्यास डर्टी टॉक करुन हाताचा वापर करुन (तोंंडाला स्पर्श टाळा) फोरप्ले करा पण किसिंग आणि ओरल सेक्स टाळा.

-सेक्स वेळी रिव्हर्स काऊ गर्ल, डॉगी स्टाईल अशा पोझिशन्स वापरा जेणेकरुन तुम्हा दोघांंचे तोंंड एकमेकांंपासुन लांंब असेल.

-सेक्स आधी आणि नंंतर दोन्ही वेळेस स्वच्छ आंघोळ करा, निदान नीट सॅनिटायजेशन करुन घ्या.

-सेक्स करताना मास्क चा वापर करा. COVID-19 बाधित रुग्णाच्या वीर्यात कोरोना विषाणू सापडल्याने संकटात भर पडण्याची शक्यता

-सेक्स टॉईजचा वापर करणार असाल तर त्याआधी ही टॉईज नीट स्वच्छ करा.

-पार्टनर मध्ये कोरोनाची लक्षणे असल्यास, किंंवा साधा सर्दी खोकला जरी असेल तरी सेक्स करणे टाळा.

दरम्यान आपण सगळेच जाणतो की सेक्स हा केवळ मज्जा म्हणुन नाही तर तुमच्या शरिराला अनेक फायदे देईल असा प्रकार आहे, रक्तदाब ते मानसिक तणाव अनेक समस्यांंवर सेक्स हे एक उत्तर ठरु शकते, यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळित होतो, हार्मोन्स चा प्रवाह नीट होतो परिणामी मूड स्विंग्स सारख्या समस्या सुद्धा दुर होतात. मात्र हा कोरोनाचा काळ धोक्याचा आहे, आम्ही असे सांंगणार नाही की सेक्स करुच नका पण हो काळजी आवश्य घ्या.