Female Judge Kiss Prisoner: कैद्याचे चुंबन घेताना महिला न्यायाधीश कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
Kiss In Prison | (Photo Credit: Twitter)

पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येसाठी दोषी ठरलेल्या कैद्याचे चुंबन (Female Judge Kiss Prisoner) घेताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने अर्जेंटिनाच्या एका महिला न्यायाधीशाने स्वत:ला अडचणीत आणले. ही महिला न्यायाधीश दक्षिणी चुबुत (Chubut) प्रांतातील असून, मेरीएल सुआरेझ (Mariel Suarez) असे त्यांचे नाव आहे. ही घटना 29 डिसेंबर 2021 रोजीची आहे. जेव्हा त्यांनी क्रिस्टियन 'माई' बुस्टोस (Cristian 'Mai' Bustos) नावाच्या कैद्याचे तुरुंगात चुंबन घेतले. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हत्येच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणात क्रिस्टियन 'माई' बुस्टोस याच्यावर आठवडाभरापूर्वीच एक खटला सुरु होता. या खटल्यात न्यायाधीश मारिएल यांनी या कैद्याला जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न केला होता.आता तर त्या दोघांचे एकमेकांप्रती जिव्हाळा दर्शवणारे फोटोच पुढे आल्याने सोशल मीडिावरुन न्यायाधीशांवर टीकेची झोड उटली आहे.

आरोपी असलेला कैदी क्रिस्टियन 'माई' बुस्टोस याला पोलीस अधिकारी लिआंद्रो 'टिटो' रॉबर्ट्स ( Leandro 'Tito' Roberts) यांच्या हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिक्षा द्यायची किंवा नाही, याबाबत निर्णय घेण्याच्या पॅनलमध्ये मेरीएल सुआरेझ यांचा समावेश होता. या खटल्यात कामकाज पाहणाऱ्या पॅनलमध्ये त्या एकमेव महिला न्यायाधीश होत्या. तसेच, आरोपी क्रिस्टियन माई बुस्टोस याला शिक्षा देण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी आपले मत नोंदवले होते. विशेष म्हणजे बुस्टोस हा एक धोकादायक गुन्हेगार असल्याचे माहिती असूनही त्यांनी अशा प्रकारचे मत नोंदवले होते. (हेही वाचा, Husband Wife Relationship: लैंगिक संबंधापासून वंचीत ठेवतो, Sex कर म्हणताच मारहाण करतो; पतीविरोधात पत्नीची तक्रार)

व्हिडिओ

दरम्यान, क्रिस्टियन माई बुस्टोस आणि आपल्यात स्नेहबंध असल्याचा आरोप न्यायाधीश मेरीएल सुआरेझ यांनी फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 'मी त्याला पहिल्यांदा खटल्यातच पाहिलं होतं. त्याच्याशी माझा कोणताही भावनिक संबंध नाही. मी त्याला भेटायला गेले आणि चुंबन घेतले याचे कारण इतकेच की मी त्याच्यावर एक पुस्तक लिहीत आहे. या पुस्तकाच्या अनुशंघाने बोलताना आमच्यात मोकळेपणा यावा.