Sex Tips: सेक्सनंतर लगेच न झोपता आपल्या जोडीदारासोबत करा 'या' Romantic गोष्टी जे खुलवतील तुमचे नाते
How Shower Sex (Photo Credits: unsplash)

शरीरसंबंधानंतर अनेकदा महिला वा पुरुषास थोडेसे थकल्यासारखे वाटते. अनेकदा सेक्स (Sex) झाल्यानंतर जोडपी एकमेकांस सोडून झोपून जातात. अशा मुळ आपल्या जोडीदारास आपली गरज केवळ सेक्सपुरता होती अशी भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या नात्यात कडवटपणा देखील येऊ शकतो. यामुळे सेक्स केल्यानंतर लगेच झोपून न जाता आपण आपल्या जोडीदारासोबत काही रोमँटिक गोष्टी केल्या पाहिजे. ज्यामुळे आपला जोडीदारही खूश होईल आणि सेक्सनंतर त्याच्या मनावर आलेले दडपण कमी होईल. या टिप्स जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असाल तर नक्की ट्राय केल्या पाहिजे.

तुमची सेक्स लाईफ आणि तुमचे नाते आणखी बहरवण्यासाठी तुम्हाला या सेक्स टिप्स नक्कीच कामी येतील. विशेषत: महिलांना आपल्या पुरुष जोडीदाराने अशा रोमँटिक गोष्टी केलेल्या फार आवडतात.

1. सेक्सनंतर जोडीदाराला द्या मसाज

सेक्सनंतर शरीर थकते. अशा वेळी जोडप्यांनी एकमेकांस विवस्त्र अवस्थेत हॉट मसाज द्यावा. यामुळे बॉडी रिलॅक्स होईल कदाचित तुम्ही आणखी संवेदनशील व्हाल ज्याचा सेक्ससाठी चांगला फायदा होईल.हेदेखील वाचा- Sex Benefits: रोज सेक्स केल्याने जोडप्यांमध्ये होतात 'हे' सकारात्मक बदल जे नात्यातील दुरावा करतील कमी

2. एकमेकांना घट्ट मिठी मारा

सेक्सनंतर एकमेकांपासून वेगळं न होता छान एकमेकांना घट्ट मिठी मारा. या मिठीतील तो प्रेमळ स्पर्श प्रत्येक स्त्री-पुरुषास हवा असतो जो मनावरचे दडपण कमी करतो.

3. एकमेकांचे चुंबन घ्या

सेक्सनंतर एकमेकांना ओठांवर छान किस करा. यामुळे जोडप्यांमधील एकटेपणाची भावना दूर होईल आणि हलके वाटेल.

4. एक दुस-याला जेवण भरवा

सेक्सनंतर एकमेकांना छान बेडवर बसून एकमेकांस जेवण भरवा. ती भावना खूपच गोड आणि रोमँटिक असते.

5. एकत्र आंघोळ करा

सेक्सनंतर आपल्या जोडीदारास आंघोळ करायची इच्छा झाली असेल तर एकत्र आंघोळ करा. त्यावेळ एकमेकांचे अंग चोळत आणि एकमेकांचे अंग एकमेकांवर घासत आंघोळ करण्याचा प्रकार खूपच रोमँटिक आणि सुखावह असतो.

असे केल्यास स्त्रियांना सेक्सनंतर मनावर आलेले दडपण कमी होते आणि आपला जोडीदार आपल्या कायम सोबत आहे अशी भावना मनात तयार होते. त्यासाठी तुम्ही काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे पुढील वेळी सेक् करताना कदाचित तुमच्या महिला जोडीदारावर तितकेसे दडपण येणार नाही आणि तुम्ही सेक्सचा दीर्घकाळ अनुभव घेऊ शकाल.