राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

6 नोव्हेंबर 2019 या दिवशी तुमच्या राशीनुसार काय केल्यास फायदा होईल तसेच आर्थिक व कौटुंबिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीमधील व्यक्तींचे नशीब आज चमकण्याची शक्यता आहे तर कोणाला कामात अधिक दक्षता बाळायची गरज आहे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: तुमचा राग एखाद्या संकटात पाडू शकतो. त्यामुळे इतरांशी वाद घालणे टाळा. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. घरातील कामांचा व्याप वाढेल. तसेच मित्रपरिवारासह वेळ घालवाल. प्रिय व्यक्तीशी तुमचे भांडण होऊ शकते.

शुभ उपाय- गुळ घाऊन बाहेर जा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- सफेद

वृषभ: या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असेल. कामात चुका होतील परंतु नीट लक्ष देऊन केल्यास ती पूर्ण करता येतील. आई-वडिलांची साथ लाभेल. बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची गोष्ट कळेल.

शुभ उपाय- वडाच्या झाडाला पाणी घाला.

शुभ दान- भुकलेल्यांना अन्न दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आजच्या दिवसाची सुरुवात ही उत्साही होईल. घरातील मंडळींकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तसेच आजवर केलेल्या प्रयत्नांना फळ मिळाले असे तुम्हाला वाटेल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- गाईला चारा खाऊ घाला.

शुभ अंक- 1

शुभ रंग- आकाशी

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींनी जास्त पैसे खर्च करण्यावर ताबा ठेवा. आई-वडिलांशी आदराने वागा. कामात कोणताही निर्णय घेताना घाई करु नका. मित्रपरिवारासह बाहेर जाण्याचा बेत आखा.

शुभ उपाय- आजच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा देऊ करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- करडा

सिंह: कायद्यासंबंधित कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नवी संधी साधून येईल. मित्रपरिवाराशी गाठभेट होईल.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आज दुसऱ्यावर पैसे खर्च करणे टाळा. घरात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आई-वडिलांशी आदराने वागा. प्रिय व्यक्ती तुम्हाला तुमचा चुका समजून देण्याचा प्रयत्न करेल. सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

शुभ उपाय- शिवलिंगावर पाणी अर्पण करा.

शुभ दान- वृद्ध व्यक्तींना वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- पिवळा

तुळ: आजचा दिवस तुळ राशीतील व्यक्तींनी स्व:ताच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्या. आई-वडिलांकडून तुम्हाला लग्नासंबंधित गोड बातमी कळेल. नोकरीच्या ठिकाणी काम करण्यापूर्वी ते तपासून पाहा. मित्रपरिवाराचे तुम्हाला कामात मदत होईल. प्रिय व्यक्तीकडून छानसे गिफ्ट मिळेल.

शुभ उपाय- दही किंवा मध खाऊन बाहेर जा.

शुभ दान- आजारी व्यक्तींना पैश्यांच्या बाबत मदत करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

वृश्चिक: वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस आनंदात घालवता येणार आहे. घरातील कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी वाद होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खुश असेल.

शुभ उपाय- घरातील वृद्ध व्यक्तींना छानसे गिफ्ट द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळा

धनु: या राशीतील व्यक्तींनी आज संभाळून काम करा. अतिघाई संकटात नेई अशी स्थिती स्वत:वर ओढवून घेऊ नका. आई-वडिलांचा मान राखा. नोकरीच्या बाबतीत उत्तम दिवस असेल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल

शुभ उपाय- अर्धा कप दुध प्या.

शुभ दान- राईचे तेल दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा

मकर: तुम्ही आज एका वेगळ्याच अंदाजात काम पूर्ण कराल. प्रकृती थोडी बिघडेल परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रिय व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सूप प्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- क्रिम कलर

कुंभ: राशीप्रमाणे आजचा तुमचा दिवस आळसावलेला जाईल. काम करण्याचा उत्साह वाटणार नाही. आई-वडिल दोघांशी चांगले वागा. कामात दिरंगाई करु नका. मित्रपरिवारासह बाहेर फिरायला जा.

शुभ उपाय- कोणाचे उष्ट खाऊ नका.

शुभ दान- अत्तर दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- केशरी

मीन: या राशीतील व्यक्तींनी आज वाहन सावधपणे चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. घरातून निघण्यापूर्वी आई-वडिलांचा आशिर्वाद घ्या. मित्रपरिवारासह नव्या गोष्टी शिकण्यास तयार रहा. प्रिय व्यक्तीकडून तुमचे आज कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर जा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- हिरवा