रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिचे डिसेंबरमध्ये शुभमंगल होणार आहे. ईशाचा विवाह उद्योगपती अजय पिरामल यांच्या मुलाशी आनंद पिरामल होणार आहे. काही दिवसांपूर्वी इटलीत ईशा-आनंदचा साखरपुडा पार पडला. लवकरच विवाहबद्ध होणारी ईशा अंबानी लग्नानंतर वरळी सीफेस जवळील बंगल्यात राहायला जाणार आहे. हा बंगला अनेक सुखसोयींनी सजलेला आहे. ईशा-आनंद पीरामल साखरपूडा ; कोण कोण असेल तिच्या सासरच्या घरी ?
उद्योगपती अजय पिरामल यांनी तब्बल 452 कोटींना हा बंगला खरेदी केला आहे. मुलगा व सून यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून हा बंगला देण्यात येणार आहे. ईशा-आनंदचा हा नवा बंगला 50 हजार चौरस फुटांचा असून पाचमजली आहे. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नपत्रिकेची खास झलक (Video)
काय आहेत बंगल्याची वैशिष्ट्यं?
# ईशा-आनंदच्या नव्या बंगल्यात बेसमेंटला तीन मजले असून त्याचा वापर सर्व्हिस आणि पार्किंगसाठी करण्यात येणार आहे. ईशा अंबानी सर्वात लहान करोडपती ; इतकी आहे तिची संपत्ती
# त्यानंतर बेसमेंटला एक लॉन, ओपन एअर वॉटर बॉडी आणि डबलल हाईट मल्टिपर्पज रुम आहे.
# तळमजल्याला एक एंट्रन्स लॉबी आहे.
# वरच्या मजल्यावर लिव्हिंग रुम, डायनिंग हॉल, ट्रिपल हाईट मल्टिपर्पज रुम, बेडरुम आणि स्टडीज असणार आहे.
आनंद पिरामल हा पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा एकुलता एक मुलगा आहे. अजय पिरामल यांची पिरामल एंटरप्रायजेस फार्मा, हेल्थकेअर, रियल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्व्हीसेस, ग्लास पॅकेजिंग आणि फायनान्स सर्व्हीस या क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी 30 देशांमध्ये बिजनेस करते. यात युएस, युके, जपान, साऊथ आशिया या देशांचा समावेश आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स 100 पेक्षा जास्त मार्केटमध्ये विकले जातात.