
मुकेश अंबानी आणि नीता अंबानीची लेक ईशा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी ईशा आणि आनंद पिरामलचा साखरपुडा इटलीमध्ये पार पडला. त्यानंतर आता 12 डिसेंबर 2018 रोजी ईशा आणि आनंद पिरामल मुकेश अंबानीच्या राहत्या घरी विवाहबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात ईशा आणि आनंदच्या लग्नाची पत्रिका ठेवण्यात आली. त्यानंतर ईशा आणि आनंदच्या लग्नाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हिंदू परंपरेनुसार ईशा आणि आनंदचा विवाहसोहळा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.पिरामल आणि अंबानी कुटुंबाचे मागील 40 वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आता ते नात्यामध्ये बदलणार आहे. ईशा आणि आनंदच्या विवाहापूर्वी दोन्ही कुटुंब उदयपूरमध्ये जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे आदरातिथ्य करणार आहेत.
आनंद पिरामल हा हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेऊन भारतामध्ये आला. त्यानंतर त्याने 2 स्टार्टअप सुरू केले आहेत. सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. ईशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्याआहे. ईशाने येल युनिव्हर्सिटीमधून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये पदवी मिळवली आहे.