ईशा अंबानी लग्नपत्रिका (Photo Credits: Instagram)

देशातील सर्वात प्रसिद्ध बिजनेसमॅन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कन्येचा अर्थात ईशा अंबानीचा 12 डिसेंबरला विवाह होणार आहे. हा विवाहसोहळा शाही असणार यात काही वादच नाही. त्यामुळे सोहळ्यातील प्रत्येक लहान सहान गोष्ट ही खास असणारच. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेची खास झलक समोर आली आहे.

ईशा-आनंदची ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ही फक्त पत्रिका नसून एक बॉक्स आहे. यातील पहिला बॉक्स हा क्रिम रंगांच्या फुलांनी सजलेला आहे. त्यावर ईशा आणि आनंदच्या नावाचे इनिशियल्स IA हे आहेत. तर दुसरा बॉक्स गुलाबी रंगाचा असून त्यात गायत्री देवीची लहानशी मुर्ती पाहायला मिळत आहे.

 

सर्व लग्नविधी मुंबईतील अंबानी रेसिडेंसमध्ये संपन्न होतील, असे काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबियांनी जाहिर केले होते. आमंत्रण पत्रिका वाटण्यापूर्वी अंबानी परिवाराने सिद्धीविनायका चरणी ईशाची लग्नपत्रिका अर्पण केली. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल 12 डिसेंबरला अडकणार विवाहबंधनात

ईशा आनंदचा लग्नसोहळा भारतीय परंपरेने पार पडेल. लग्नापूर्वी उदयपूर येथे अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी नातेवाईक आणि खास मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते.