ईशा अंबानी-आनंद पीरामल (Photo Credit : HelloMagIndia/Instagram & Instagram)

देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाचा आज साखरपुडा असून ती लवकरच वर्षाखेरपर्यंत विवाहबंधनात अडकेल. पीरामल ग्रुपचे एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर आनंद अंबानी याच्यासोबत ईशाचा साखरपूडा सोहळा इटलीत रंगणार आहे. अंबानीकन्येचा 'या ठिकाणी' होणार साखरपुडा; पहा सोहळ्याचे सर्व डीटेल्स

अंबानी कुटुंबाबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे पण पीरामल कुटुंबाविषयी तितकीही माहिती आपल्याला नाही. तर जाणून घेऊया पीरामल कुटुंबाविषयी...

आनंद पीरामल हा पीरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा एकुलता एक मुलगा.

अजय पीरामल यांची पीरामल एंटरप्रायजेस फार्मा, हेल्थकेअर, रियल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्व्हीसेस, ग्लास पॅकेजिंग आणि फायनान्स सर्व्हीस या क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी 30 देशांमध्ये बिजनेस करते. यात युएस, युके, जपान, साऊथ आशिया या देशांचा समावेश आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स 100 पेक्षा जास्त मार्केटमध्ये विकले जातात.

स्वाती पीरामल (ईशाच्या होणाऱ्या सासुबाई)

व्हाईस चेअरपर्सन, पीरामल ग्रुप

डॉ. स्वाती पीरामल या पीरामल एंटरप्रायजेसच्या डिरेक्टर आहेत. त्या भारतातील पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये सक्रिय राहणाऱ्या लीडिंग सायंटिस्ट आणि इंडस्ट्रलिस्टपैकी एक आहेत. याशिवाय त्या प्रेस्टिजस हार्वर्ड बोर्ड ऑफ एव्हरसीसच्या मेंबर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल अँड पब्लिक हेल्थच्या डीन अॅडव्हाईजर आहेत.

आनंद पीरामल (ईशाचा होणारा पती)

एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर, पीरामल ग्रुप

आनंद रियल एस्टेट बिझनेससोबत ग्रुप स्ट्रॅटजी, व्हॅल्यू अँड ऑर्गनायजेशन डेव्हलपमेंटची जबाबदारी सांभाळतो. यूनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियामधून इकॉनॉमिक्स पदवी घेतल्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्याने बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये मार्स्टर्स केले आहे. त्यापूर्वी त्याने दोन स्टार्टअप केले. एक म्हणजे ई-स्वास्थ्य आणि दुसरे म्हणजे पीरामल रिएल्टी.

नंदिनी पीरामल, (ईशाची होणारी नणंद)

एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर, पीरामल ग्रुप

एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर असण्यासोबत नंदिनी पीरामल कंपनीच्या ऑवर-द-काउंटर (OTC)बिझनेस लीड करते. नंदिनीच्या लीडरशिपमध्ये OTC बिझनेस 7 व्या स्थानावर पोहचला आहे. 2004 मध्ये तो 40 व्या स्थानावर होता. नंदिनीने स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये MBA केले आहे. पीटर डियॉन्गसोबत नंदिनी विवाहबद्ध झाली आहे.

पीटर डियॉन्ग (ईशाच्या होणा-या नंदेचे पती)

CEO, क्रिटिकल केअर, पीरामल इंटरप्राइजेस लिमिटेड

प्रिंसटनमधून ग्रॅज्यूएशन केल्यानंतर त्याने न्यूयॉर्कच्या McKinsey & Company मध्ये त्यांनी काम केले. येथे ते फार्मास्यूटिकल आणि मेडिकल डिव्हाईस कंपन्याच्या प्रोजेक्टमध्ये काम करत होते. त्याचबरोबर त्यांनी यूएस, यूरोप आणि इंडियाच्या हेल्थकेअरमध्ये कंसल्टिंग म्हणून काम केले आहे.