आनंद आणि ईशा (Photo Credits: HelloMagIndia/Instagram & Instagram)

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा लवकरच पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. देशातील आणखी एक मोठा उद्योग समूह असलेल्या पिरामल एंटरप्रायजेसचे अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्याशी ईशाची लग्नगाठ पक्की झाली आहे. नुकतीच मुंबईमध्ये यांच्या साखरपुड्याची एक शानदार पार्टी पार पडली, ज्याला विविध क्षेत्रातीत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. आत्ता 21 सप्टेंबरला  ईशा आणि आनंद ऑफिशियली इटली येथे एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालणार आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला आनंदने महाबळेश्वर येथील एका मंदिरामध्ये ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने होकार दिल्यानंतर मे मध्ये दोन्ही कुटुंबाकडून एका जंगी पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते.

कुठे होणार ईशा आणि आनंदचा साखरपुडा ?

येत्या विकएंडला ईशा आणि आनंद यांचा ऑफिशियल साखरपुडा होणार आहे. हा सोहळा तब्बल तीन दिवस चालणार असून त्यासाठी इटलीची निवड करण्यात आलेली आहे. इटली येथील 'लेक कोमो' इथे 21 तारखेला कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि 23 तारखेच्या दुपारच्या जेवणासोबत हा सोहळा संपेल.

मुलीच्या साखरपुड्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांनी इटलीमधील एका तलावाशेजारील जागा निश्चित केली आहे. लेक कोमो ही हॉलीवूडच्याही अनेक कलाकारांनी आवडती जागा आहे.

या सोहळ्यामध्ये स्पेशल लंच, डिनर, डान्ससोबतच अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

असा पार पडेल सोहळा -

21 सप्टेंबर – अंबानी कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दुपारी वेलकम लंचचे आयोजन केले आहे, ज्याला Benvenuti A Como असे नाव देण्यात आले आहे. संध्याकाळी 5 नंतर समारंभाला सुरुवात होईल. यामध्ये रात्रीचे जेवण ही स्पेशल डिनर पार्टी असणार आहे, जी Villa Balbianoमध्ये पार पडेल. या रात्रीच्या समारंभाला Amore E Bellezza असे नाव देण्यात आले आहे ज्याचा अर्थ ‘प्रेम आणि सुंदरता’ असा होतो.

Villa Balbiano

22 सप्टेंबर – दुसऱ्या दिवशी Villa Gastel मध्ये साखरपुड्याचा समारंभ पार पडेल. जो Fiera Bella Italia या नावाने ओळखला जाईल. संध्याकाळचे जेवण आणि डान्स हा Villa Olmo मध्ये आयोजित केला गेला आहे, ज्याचे नाव असेल Italianissimo.

23 सप्टेंबर – रविवारी दुपारी Arrivederci Como या नावाने, Duomo di Como आणि Teatro Sociale Como येथे पाहुण्यांसाठी स्पेशल लंच आयोजित केला आहे.

ड्रेस कोड

या संपूर्ण समारंभासाठी अंबानी कुटुंबीयांकडून ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे.

पहिल्या दिवसाच्या लंचसाठी कॅज्युअल कपडे तर रात्रीची डिनर पार्टी ही ‘ब्लॅक-टाय’समारंभ असेल. यामध्ये पाहुणे भारतीय फॉरमलमध्ये देखील दिसून येतील.

दुसऱ्या दिवशीच्या महत्वाच्या समारंभासाठी पाहुणे Como Chicमध्ये असतील, तर रात्रीच्या डिनर आणि डान्ससाठी cocktail attire हा ड्रेस कोड असणार आहे.

तिसऱ्या दिवशीच्या लंचसाठी पाहुणे smart casual ड्रेसकोड मध्ये असतील

अशा भव्य साखरपुड्याच्या समारंभानंतर डिसेंबरमध्ये मुंबईतच ईशा आणि आनंद यांच्या लग्नाचा समारंभ पार पडणार आहे.  आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. तर इशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमधून पदवी मिळवली आहे.