ईशा अंबानी सर्वात लहान करोडपती ; इतकी आहे तिची संपत्ती
ईशा अंबानी (Photo Credits: Isha Ambani FC)

अंबानीकन्या ईशा अंबानीचा साखरपुडा नुकताच इटलीत पार पडला. इटलीत दिग्गजांच्या, सेलिब्रेटींच्या उपस्थितीत ईशा-आनंदचा साखरपुडा सोहळा रंगला. या वर्षाखेरीजपर्यंत ईशा अंबानी विवाहबद्ध होईल. त्यापूर्वी प्री-वेडिंग सेलिब्रेशन उदयपूरमध्ये होणार आहे. ईशा-आनंद पीरामल साखरपूडा ; कोण कोण असेल तिच्या सासरच्या घरी ?

 अरबपती बिजनेस वुमनच्या यादीत पटकावले स्थान

अंबानी इंटस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाने स्वकर्तृत्वावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. 2015 च्या फोर्ब्सच्या सर्वात लहान अरबपती बिजनेस वुमनच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर होती. तर 2018 च्या उत्तराधिकारी यांच्या यादीतही ईशाचे दुसरे स्थान आहे.

आहे इतक्या कोटींची मालकीन

सध्या ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाची पदं सांभाळत आहे. ईशा अंबानीचे वार्षिक उत्पन्न 4710 कोटी रुपये आहे. ईशा 16 वर्षांची असताना ती 80 मिलियन डॉलरची मालकीन होती. ईशा सध्या रिलायन्स टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांची डिरेक्टर आहे. मुकेश अंबानी ठरले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा इतकी आहे संपत्ती

इतके आहे ईशाचे शिक्षण

ईशाचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला असून तिचा भाऊ आकाश आणि ती जुळे आहेत. धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले असून येल युनिव्हर्सिटीतून तिने सायकोलॉजी आणि एशियन स्टडीजमध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे. त्यानंतर तिने अमेरिकाच्या ग्लोबल कन्सलटेंसी फर्म मकिंसेमध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम केलं.