नसबंदीसाठी घाबरणाऱ्या पुरुषांसाठी खुशखबर; आता एकाच इंजेक्शनमुळे 13 वर्षांची चिंता मिटणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

Contraceptive Injection For Men : लोकसंख्या वाढ हा भारतासमोरील एक गहन प्रश्न बनला आहे. कंडोमचा करण्यात येत असलेला प्रचार यांमुळे यावर काही प्रमाणात आळा बसत आहे, मात्र त्यातूनही हा प्रश्न सुटत नसल्याचे लक्षात येत आहे. नसबंदी (Sterilization) हा यावरील एक ठोस उपाय सांगितला जातो. मात्र ही प्रक्रिया शस्त्रक्रियेची असल्याने अनेक लोक यासाठी टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून भारतीय संशोधकांनी पुरुषांसाठी एका इंजेक्शनची निर्मिती केली आहे. या इंजेक्शनमुळे गर्भधारणा टाळता येऊ शकणार आहे, तसेच तुम्हाला नसबंदी करण्याचीही गरज भासणार नाही. या इंजेक्शनची चाचणी पूर्ण झाली असून, 95 टक्के सकारात्मक रिझल्ट मिळाले आहेत. लवकरच सर्वसामान्यांसाठी हे इंजेक्शन उपल्स्ब्ध होईल. (हेही वाचा : कंडोम वापरता? आता पिशवीही वापरा!)

गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रियांना अथवा पुरुषांना शस्त्रक्रिया करायला लागते, मात्र आता त्याऐवजी पुरुषांसाठी इंजेक्शनचा वापर होणार आहे. आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur) मधील संशोधक डॉ. एस. के. गुहा यांनी इंजेक्शनमध्ये वापरले जाणारे औषध तयार केल्याची माहिती मिळत आहे. हे इंजेक्शन गर्भधारणा करणाऱ्या दोन नसांमध्ये दिले जाते. हे इंजेक्शन या नसांमध्ये असलेले शुक्राणू तोडण्याचे कार्य करते, त्यामुळे गर्भधारणा होत नाही. या इंजेक्शनमध्ये 60 मिलीचा एक डोस असतो.

उंदीर, ससा आणि त्यानंतर इतर प्राण्यांवर या इंजेक्शनची चाचणी घेण्यात आली आहे. 303 व्यक्तींवरही फेज 1 आणि फेज 2 यांमध्ये या इंजेक्शनची चाचणी झाली आहे. यातून हे इंजेक्शन गर्भधारणा रोखण्यात 99.2 टक्के यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने या इंजेक्शनची ही यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. तसा अहवालही आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरच हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध होईल अशी आशा आहे.