प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

महिला त्यांच्या सौंदर्याबाबत खूप काळजी करतात. त्यासाठी विविध ब्यूटी प्रोक्डक्ट्स ही वारले जातात. परंतु जर तुम्हाला केसगळती आणि डँड्रफची समस्या भेडसावत आहे तर करा हे उपाय.

केसांची काळजी घेण्यासाठी प्रामुख्याने तेलाचा उपयोग केला जातो. तसेच काही महिला घरगुती उपयांसोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने केसांची समस्या थांबविण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलतानी माती ही जेवढी स्किनसाठी  उपयुक्त मानली जाते तेवढीच केसांच्या समस्येसाठी गुणकारी आहे.

मुलतानी मातीचा मास्क तयार करण्यासाठी त्यात लिंबाचा रस, बेकिंग सोडा, दही आणि मुलतानी मातीचे मिश्रण तयार करावे. त्यानंतर हे मास्क केसांवर व्यवस्थितपणे लावून 30 मिनिटांपर्यंत ठेवावे. यामुळे केसातील तेलकटपणा, डँड्रफ आणि जर केसांमध्ये विचित्र वास येत असेल तर तोही नाहीसा होण्यास मदत होईल. तसेच केसांची मुळे घट्ट होण्याच्या मदतीसोबत केसगळती कमी होते.