प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढत्या जबाबदाऱ्या आणि महागाईमुळे सध्याच्या काळात बचत करणे कठीणच होऊन बसले आहे. त्यामुळे बहुतांश जण आपल्या दैनंदिन होणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध मार्गांचा वापर करतात. परंतु तरीही खर्च काही नियंत्रणात येत नाही. त्यामुळे अधिकच चिंता वाढत असून बचत करण्यासाठी नेमके काय करावे हा विचार पडतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज तर असते. परंतु जर पैशांची बचत किंवा आपल्याकडे तेवढे पुरेसे पैसे नसल्यास आपण काहीच करु शकत नाही. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट जरी खरेदी किंवा ती करायची झाल्यास पैशांच्या अभावी करणे शक्य होत नाही. त्यामुळे यासाठी उत्तम पर्यात म्हणजे प्रत्येकाने स्वत:ला बचत करण्याची सवय लावावी.

तर खर्च करण्यापूर्वी तुम्ही किती पैसे महिन्याभरात बचत करणार आहात त्याबाबत प्रथम विचार करा. खरंच जर तुम्हाला पैशांची बचत करायची असल्यास तर तुमचे खर्च करण्याचे मार्ग बदला. पगारातून शक्य तेवढे पैसे बचत करण्याकडे लश्र द्या. खर्च होण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवा. त्याचसोबत काही जण खर्च करण्यासाठीचे पैसे बाजूला काढून बचतीसाठी पैसे ही काढतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडी एखाद्या डायरीमध्ये हिशोबाप्रमाणे बजेट तयार करा. औषध, रुग्णालयासाठी लागणारे पैसे बाजूला काढून ठेवा. ऐवढेच नाहीच तर सर्व खर्च डायरीत लिहिण्याची सवय सुद्धा लावा. त्यामुळे तुम्हाला उगाचचा होणारा किती खर्च आहे ते समजू शकेल.(World Population Day: 'जागतिक लोकसंख्या दिन' निमित्त जाणून घ्या जगातील 7 खंडामध्ये राहणाऱ्या लोकांची थक्क करणारी आकडेवारी)

बहुतांश जणांचा बाहेर फिरायला जाणे, खरेदी करणे किंवा खाण्याची आवड असते. परंतु तुमच्या आवश्यकता आणि इच्छा यांच्यामधील फरक करणे शिका. असे नको व्हायला की तुमच्या इच्छा पुर्ण करण्याच्या नादात तुम्ही पूर्ण महिन्याचे बजेट ठरवले आहे ते कोलमडले जाईल.आजकाल लोक प्लास्टिक मनीच्या माध्यमातून बहुतांश व्यवहार करतात. या कार्ड्सचा नादात लोक अशा सुद्धा वस्तू खरेदी करतात ज्यांची गरज सुद्धा नसते. त्यामुळे पैसे देऊन जर वस्तू खरेदी करायचे झाल्यास लोक त्याबाबत आधी विचार करतात. प्रत्येक व्यक्तीचा पगार विविध स्वरुपाचा असल्याने असे गरजेचे नाही की त्यामधील अधिक हिस्सा बचतीसाठी ठेवावा. बचत करण्यासाठी प्रथम लहान रक्कम ही वापरु शकता. लक्षात ठेवा लहान बचत पुढे जाऊन मोठी होणारच आहे.