2012 पासून दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी वर्ल्ड हार्ट फेडरेशन द्वारे जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना माहिती देण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. जगात दरवर्षी हृदयरोग, स्ट्रोक यासह हृदयविकाराचा आजारांनी 17.9 दशलक्ष लोक मरण पावतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये तंबाखूच्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे, अस्वास्थ्यकर खाणे टाळणे, नियमित व्यायामासाठी वेळ काढणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारणे हे आहे. जागतिक हृदय दिन 2021 च्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला काही अन्नपदार्थ सांगणार आहोत जे तुम्हाला हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. (Heart Attack In Youth: कमी वयात हार्ट अटॅक कसा टाळाल? मुंबईच्या प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या 6 अनमोल टिप्स!)
अक्रोड: दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते. अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक एसिड (ALA) असते, जे प्रामुख्याने हृदयाच्या आरोग्यासाठी जबाबदार असलेले ओमेगा -3 फॅटी एसिड असते.
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयरोगापासून बचाव करते. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की डार्क चॉकलेट रक्त अधिक सहजपणे धमन्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करते आणि त्यांची लवचिकता टिकवून ठेवते. यासह, ते पांढऱ्या रक्त पेशींना रक्तवाहिन्यांच्या भिंतीला चिकटण्यापासून प्रतिबंधित करते. अशा स्थितीत चॉकलेट खाल्ल्याने धमन्यांमध्ये अडथळा येण्याची समस्या दूर होऊ शकते.
हिरव्या पालेभाज्या: दिवसातून किमान 5 वेळा भाज्या खा. आपण त्यांना वाफवून, ग्रील करून किंवा हलके तळून खाऊ शकता. भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. आरोग्य तज्ञांच्या मते, लोकांनी आपली जेवणाची अर्धी प्लेट भाज्यांनी भरली पाहिजे. भाज्या आणि फळांचे नियमित सेवन तुमचे हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी ठेवते.
फॅटी फिश: अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) च्या सूचनेनुसार आठवड्यातून दोनदा मासे खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. हृदयाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात मॅकरेल, वन्य सॅल्मन सारख्या फॅटी माशांचा समावेश करणे आवश्यक आहे.
अळशी : आपण सकाळी नाष्टयामध्ये अळशीच्या बीयांचा समावेश केसा पाहीजे. हे आपल्या निरोगी हृदयासाठी आवश्यक अन्न मानले जाते. खरं तर, ओमेगा 3 आवश्यक फॅटी एसिड फ्लेक्स बियाण्यांमध्ये आढळतात, ज्याची गणना चांगल्या चरबीच्या श्रेणीमध्ये केली जाते. ओमेगा 3 फॅटी एसिड थेट हृदयासाठी एक फायदेशीर पोषक आहेत, ज्यामुळे आपण आपल्या आहारात समाविष्ट करून हृदयरोगापासून दूर राहू शकता.