मासे खाणे अनेकांना आवडते. पण त्याचा वास अगदी सर्वांनाच नकोसा होतो. मासे बनवताना त्याचा वास अगदी घरभर पसरतो. घरात येणाऱ्या पाहुण्यालाही तुमच्या घरी आज काय बेत आहे याचा थांग लागतो ते या वासावरुनच. मग हा माशांचा वास दूर कसा करायचा? यासाठी काही सोप्या टिप्स....
# मासे बनवताना आणि बनवल्यानंतर पंखा चालू ठेवा. त्यामुळे घरात माशांचा वास टिकून राहणार नाही.
# मासे बनवल्यानंतर घरात सुगंधित मेणबत्ती पेटवा. त्यामुळे घरातील माशांचा वास कमी होण्यास मदत होईल आणि घर सुगंधित होईल. लेमन आणि पेपरमिंट सेंट असलेल्या मेणबत्त्या घरातील कोणत्याही प्रकारची खाण्याची दुर्गंधी कमी करेल.
# माशांचा वास दूर करण्यासाठी खिडकी आणि दरवाजा पूर्णपणे उघडा. यामुळे घरात कोंडलेला माशांचा वास अगदी सहज दूर होईल.
# रुम फ्रेशनर हा एक उत्तम उपाय आहे. घरातील माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही रुम फ्रेशनरचा वापर करु शकता.
# मासे बनवल्यानंतर भांडी, किचन कोमट पाणी आणि व्हिनेगरने स्वच्छ केल्यास माशांचा वास पूर्णपणे निघून जातो.