Historical Experiment: मानवीश शरीरात डुकराचे हृदय, अमेरिकेतील डॉक्टरांकडून पहिला प्रयोग यशस्वी
Pig Heart Transplant | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ऐकावे ते नवलच! आजच्या जगात विज्ञान इतके पुढे गेले आहे की, ज्यामुळे 'काहीही घडू शकते' यावर विश्वास यावर विश्वास बसू लागला आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी (American Doctors) एक ऐतिहासिक प्रयोग (Historical Experiment) करुन दाखवला आहे. या डॉक्टरांनी एका व्यक्तीला चक्क डुकराचे हृदय (Pig Heart ) बसवले आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अमेरिकेतील मेरीलँड येथील 57 वर्षिय बेनेट नामक व्यक्तीमध्ये काही अनुवांशिक बदल करत डॉक्टरांनी डुकराचे हृदय बसवले. जगातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे त्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. डुकराचे हृदय जनुकीय बदल करुन त्याचे प्रत्यारोपन मानवी शरीरात झाल्याने वैद्यक शास्त्रातील ही एक मोठी क्रांती मानली जात आहे. या प्रत्यारोपनामुळे व्यक्तीच्या हृदयाला आता पंप लावण्याची आवश्यकता नाही.

मेरीलँड मेडीसीन यूनिवर्सिटीमध्ये झालेल्या या सर्जरीबाबत बेनेटच्या हवाल्याने म्हटले आहे की, समोर एक प्रश्न होता की एक तर मृत्यू किंवा हृदय प्रत्यारोपण. मला जगायचे होते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्याचा प्रकार होता. परंतू, मला माझा शेवटचा प्रयत्न करुन पाहायचा होता. जो यशस्वी झाला. यूएस फूड अँड ड्रग्ज एडमिनिस्ट्रेनशनने 31 डिसेंबरला सर्जरी करण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रीयेस मंजूरी दिली. (हेही वाचा, आश्चर्यंम! आशिया खंडातील सर्वात जाड महिलेवर मुंबई येथे शस्त्रक्रिया; 300 किलोवरून 86 किलो झाले वजन)

दरम्यान, डुकराचे तीन अशी जनुके बाहेर काढणयात आली. ज्यामुळे मानवी प्रतिकारशक्ती (Human Immune System) डुकराच्या हृदयाला स्वीकारत नाही. एक जनुक असे काढण्यात आले की, जेणेकरुन डुकराच्या हृदयातील टिशूची ग्रोथ थांबवली जाई. ज्यामुळे त्यामध्ये जीन्स (जनुके) घालण्यात येतील.

ट्विट

डॉक्टर आता बेनट यास पुढील काही दिवस निरिक्षणाखाली ठेवतील. प्रत्यारोपण केलेले हृदय वास्तवात चांगले काम करते आहे किंवा नाही याबाबत विशेष निरिक्षण नोंदवले जाईल. नव्या गुंतागुंतीकडेही डॉक्टरांचे लक्ष असेल. सर्जन डॉ. बार्टले पी. ग्रिफिथ यांनी एका प्रतिक्रियेत म्हटले की, 'ट्रान्सप्लांट साठी ह्यूमन हार्ट डोनर उपलब्ध नव्हता. त्यामुळे आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत जगातील ही पहिलीच शस्त्रकिया यशस्वी केली.'