अमिता रजनी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील रहिवासी 42 वर्षीय अमिता रजनी (Amita Rajani), यांना आशिया खंडातील सर्वात जाड महिला म्हणून ओळखले जात होते. मात्र आता रजनी यांच्यावरील वजन घटवण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे यशस्वी पार पडली असून, 4 वर्षांनंतर त्यांचे वजन 300 किलोवरून 86 किलो इतके झाले आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन आणि लीलावती हॉस्पीटल आणि हिंदुजा हेल्थकेअर सर्जिकल हॉस्पिटलमधील लॅपरो ऑबेसो सेंटरचे संस्थापक, संस्थापक डॉ. शशांक शाह (Shashank Shah) यांनी रजनी यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

रजनी यांचा जीवनप्रवास पाहता अतिशय अशक्यप्राय गोष्ट सत्यात उतरली आहे. याबाबत सर्वत्र आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. रजनी जेव्हा 6 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांचे वजन वाढायला सुरुवात झाली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे वजन 126 किलो इतके होते. त्यानंतर वाढणाऱ्या वजनामुळे त्यांना रोजच्या जीवनातील सामान्य गोष्टी करणेही अशक्य झाले होते. देशात, विदेशात अनेक डॉक्टरांना भेटूनही त्यांच्या स्थूलपणावर काही तोडगा निघाला नाही. (हेही वाचा: अचाट कामगिरी; जोडप्याने एका वर्षात कमी केले तब्बल १७० किलो वजन)

जेव्हा अमिता यांचे वजन 300 किलो पर्यंत पोहचले तेव्हा त्यांना घरातून बाहेर पडणेही अशक्य झाले. शेवटी त्यांनी शशांक शाह यांची भेट घेतली. डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. फक्त स्थूलपणाच नाही तर, ड्रेनेटेड कोलेस्टेरॉल, किडनी डिसफंक्शन, टाइप II मधुमेह आणि श्वास घेण्याची समस्या अशा अनेक व्याधी अमिता यांना जडल्या होत्या.

अशी होती शस्त्रक्रिया –

शस्त्रक्रियेच्या आधी 2 महिने यावर तयारी चालू होती. अमिता यांच्यासाठी रुग्णवाहिकेचे दरवाजे काढले होते, साडेसहा फुटांचा सोफा रुग्णवाहिकेत बसकिण्यात आला. रुग्णालयामध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता, त्यांच्यासाठी खास बेड, कपडे इ. गोष्टींची सोय करण्यात आली होती. त्यांची शस्त्रक्रिया दोन भागांत पार पडली. 2015 मध्ये चयापचय शस्त्रक्रिया (Metabolic Surgery) झाली, त्यानंतर 2017 मध्ये गॅस्ट्रिक बायपास (Gastric Bypass) करण्यात आली. त्यानंतर अमिता यांचे वजन कमी होण्यास सुरुवात झाली. अखेर चार वर्षांनतर अमिता यांचे वजन 300 वरून 86 किलो इतके झाले.