फार्मा कंपनी Pfizer and BioNTech यांच्याकडून सहा महिन्यांच्या बालकांपासून 4 वर्षाच्या मुलापर्यंत चिमुकल्यांना देखील कोविड 19 ची लस देण्यात यावी याकरिता मागणी होत आहे. अमेरिकेमध्ये याच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी US Food and Drug Administration कडे त्यांनी अर्ज केला आहे. जर त्यांना ही मंजुरी मिळाली तर जगात Pfizer and BioNTech ची कोविड 19 लस ही पहिली लस असेल जी लहान मुलांसाठी म्हणजेच 5 वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असेल. येत्या काही दिवसांमध्ये त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
सध्या अमेरिकेमध्ये कोरोना वायरसची लागण झाल्याने 5 वर्षांखालील मुलांचे हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता भविष्यातील कोविड 19 व्हेरिएंटचे धोके पाहता मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा आमचा पर्याय असल्याचं Albert Bourla, Chairman and Chief Executive Officer, Pfizer यांनी म्हटलं आहे. Omicron Scare: अमेरिकेमध्ये वाढते कोरोना रूग्ण पाहता 12-15 वयोगटातील मुलांनाही Pfizer Vaccine Booster Shot देण्यास US CDC ची शिफारस.
6 महिने ते 4 वर्षांच्या बालकांना कोविड 19 पासून प्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या डोसचे 3 डोस लागणार आहेत. जरी दोन डोस साठी परवानगी मिळाली तरी पालक आता त्यांच्या मुलांसाठी कोविड 19 व्हॅक्सिनेशन सिरीज सुरू करू शकतात. तिसर्या डोस बाबत पुढील टप्प्यात तो पर्यंत विचार केला जाऊ शकतो.
सध्या फायझरची कोविड 19 लस ही सार्याच वयोगटातील नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. जगभरात झालेल्या क्लिनिकल ट्रायल्स वरून ते सिद्ध देखील झालं आहे. आता एफडीए कडून 5 वर्षाखालील मुलांनाही ही लस उपलब्ध झाल्यास कोविडच्या लागण नंतर त्यांची स्थिती गंभीर होण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.