Omicron Symptoms: भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 1,17,100 रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 28.8 टक्के अधिक रुग्ण मिळाले आहेत. तर कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन यामुळे सुद्धा अधिक चिंता वाढली आहे. नव्या वेरियंचे देशात आतापर्यंत 3007 रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या लक्षणांमुळे हेल्थ एक्सपर्ट्सद्वारे वेळोवेळी माहिती दिली जात आहे.(भारत बायोटेकला Intranasal च्या तिसऱ्या टप्प्यातील आणि बूस्टर चाचणीसाठी मिळाली परवानगी)
युएस सेंटर फॉर डिजिट कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंसन एनालिसिस यांनी या वेरियंटचे चार सामान्य लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये खोकला, थकवा, कफ आणि नाक वाहणे. तर एम्सने ओमिक्रॉनच्या पाच लक्षणांबद्दल अधिक सांगत त्याकडे दुर्लक्ष करु नका असे स्पष्ट केले आहे. तर पुढील काही लक्षणे तुमच्यात आढळून येत असतील तर तातडीने डॉक्टरांना भेट द्या.(First Omicron Death in India: भारतामध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू; केंद्र सरकारने केली पुष्टी)
-श्वास घेण्यास त्रास
-ऑक्सिजनच्या सॅच्युरेशनमध्ये घट
-छातीत सारखे दुखणे
-मेंटल कन्फ्यूजन किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देणे
हेल्थ एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, अचानक जर त्वचा, ओठ किंवा नखांचा रंग बदलण्यास सुरुवात झाल्यास अलर्ट व्हा. एक्सपर्ट्सच्या मते जर कोणताही व्हायरस संपर्कात आल्यानंतर त्याच्या 4-5 दिवसांनी लक्षण दिसन आल्यास तातडीने चाचणी करुन घ्यावी.