Novavax निर्मित Covid-19 Vaccine कोरोना व्हायरसच्या वेरिएंट्सवर 90% परिणामकारक
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी (US Biotechnology) कंपनी नोव्हाव्हॅक्स (Novavax) निर्मित कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) कोरोना व्हायरसच्या लक्षणांवर 100 टक्के परिणामकारक आहे, असे कंपनीने म्हटले आहे. या लसीच्या तिन्ही टप्प्यातील ट्रायल्समध्ये ही लस 90.4 टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले. यासाठी अमेरिका (America) आणि मेक्सिकोच्या (Mexico) 119 विविध जागांमधून 29,960 लोकांनी सहभाग घेतला होता.

कोविड-19 जागतिक संकटावर मात करण्यासाठी नोव्हाहॅक्स या लसीद्वारे एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. आता नुकत्याच आलेल्या क्लिनिकल रिझल्ट्सनुसार NVX-CoV2373 ही लस कोरोना व्हायरसच्या लक्षणांविरुद्ध अधिक प्रभावशाली असून कोविड-19 च्या सर्व वेरिएंट विरुद्ध परिणामकारक आहे, असे नोव्हाव्हॅक्स चे अध्यक्ष आणि सीईओ Stanley C Erck यांनी सांगितले आहे.

जगात भासणारी लसींची कमतरता भरुन काढण्यासाठी नोव्हाहॅक्स सातत्याने काम करत आहे. लवकरच या लसीचे सब्मिशन करुन आम्ही ही लस लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा मानस आहे, असेही पुढे त्यांनी सांगितले. (COVID-19 Vaccine Latest News Update: कोविड 19 वरील Novavax च्या संभाव्य लस NVX-CoV2373 चा सुरूवातीच्या टप्प्याचा अहवाल जाहीर; साईड इफेक्ट्स नसल्यचा दावा)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत लसीच्या मान्यतेसाठी अर्ज करण्यात येईल. यासाठी पात्रतेची अंतिम प्रक्रिया आणि केमिस्ट्री मॅन्युफॅक्चरींग आणि कंट्रोल्स रिक्यारमेंट पूर्ण करण्याची गरज आहे.

या लसीला मान्यता दिल्यानंतर तिसऱ्या तिमाहीपर्यंत दर महिन्याला 10 कोटी डोसेस आणि चौथ्या तिमाही पर्यंत दर महिन्याला 15 कोटी डोसेस उत्पादन करण्याचा आमचा मानस आहे. लसीच्या योग्य वितरणासाठी ही लस 2 ते 8 अंश सेल्सियस या तापमानात स्टोअर करावी लागते, असे कंपनीने सांगितले. मागील वर्षी नोव्हाव्हॅक्सने भारतातील सीरम इंस्टीट्यूट सोबत करार केला होता. या कराराअंतर्गत NVX-CoV2373  हे अँटीजन कमोन्टंट सीरम इंस्टीट्यूट करुन उत्पादीत करण्यात येईल.