प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभर संशोधक प्रयत्न करत आहेत. दरम्यान अमेरिकेमध्ये Novavax च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीचे परिणाम   सुरूवातीच्या टप्प्यातील परिणाम समाधान असल्याची माहिती समोर येत आहे. NVX-CoV2373, या लसीमध्ये SARS-CoV-2 या कोविड 19 ची लागण करणार्‍या व्हायरसचे जेनेटिक सिक्वेन्स सोबत इंजिनियरिंग करून लस बनवण्यात आली आहे. दरम्यान शरीरात अ‍ॅन्टिबॉडीज तयार करण्यासाठी, संसर्गाचा सामना करण्यासाठी कोरोना व्हायरसच्या प्रोटीन्सचा समावेश करण्यात आला आहे.

New England Journal of Medicine मध्ये काल प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये NVX-CoV2373 या लसीचे आरोग्यावर कोणतेही गंभीर परिणाम होत नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. अभ्यास करण्यासाठी 108 जणांना लस देण्यात आली होती. दरम्यान कोविड 19 वर मात करणार्‍यांसारख्या अ‍ॅन्टीबॉडीज या रूग्णांच्या शरीरामध्ये आढळत असल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान NVX-CoV2373 चा मागील महिन्यात मानवी चाचणीसाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये 18-59 वयातील 131 जणांना लस देण्यात आली होती. दरम्यान ट्रायल मध्ये डोस दोन टप्प्यांत देण्यात आले होते. त्यात डोसची लेव्हल 5 आणि 25 मायक्रोग्रॅम इतकी होती. COVID-19 Vaccine: पुण्याच्या Serum Institute of India चा Bill And Melinda Gates Foundation व Gaviसोबत करार; 2021 पर्यंत 100 मिलियन डोस उपलब्ध करण्याचं लक्ष्य.  

Moderna आणि Pfizer नंतर Novavax ही तिसरी कंपनी आहे ज्यांच्याकडून अमेरिकेमध्ये मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्याचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यानअमेरिकेकडून सुरक्षित आणि वेगवाग पद्धतीने लसीचा टप्पा आणि संशोधन पूर्ण व्हावं याकरिता फंडिंग देण्यात आलं आहे.

दरम्यान 2020 च्या अखेरीपर्यंत ही लस उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहितीदेखील देण्यात आली आहे.