Norovirus In America: अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन 'नोरोव्हायरस'; काय आहेत या व्हायरसची लक्षणे? जाणून घ्या
Virus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Norovirus In America: काही वर्षांपूर्वी चीनमधून कोरोना विषाणू संसर्ग (Coronavirus) संपूर्ण जगात पसरला होता. सध्या जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली दिसत आहे. परंतु, आता अमेरिकेत (America) एका नवीन विषाणू (New Virus) ने थैमान घातले आहे. या विषाणूचे नाव नोरोव्हायरस (Norovirus) आहे. सोप्या भाषेत त्याला ‘विंटर व्होमीटिंग बग’ आणि ‘पोटाचा फ्लू’ असेही म्हणतात. या विषाणूने बाधित व्यक्तीला उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने म्हटले आहे की पोटातील विषाणू, सामान्यतः 'नोरोव्हायरस' म्हणून ओळखला जातो. सध्या अमेरिकेच्या ईशान्य भागात हा विषाणू वेगाने पसरत आहे. डिसेंबर 2023 पासून नोरोव्हायरसची प्रकरणे झपाट्याने समोर येत आहेत.

नोरोव्हायरसची लक्षणे -

CDC नुसार, अमेरिकेत नोंदवलेल्या नोरोव्हायरसच्या प्रकरणांमध्ये उलट्या, अतिसार, पोट किंवा आतड्यांमध्ये सूज, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि खाण्यापिण्याशी संबंधित समस्यांचा समावेश आहे. हा रोग कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो. हा विषाणू लवकर पसरतो. सीडीसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नोरोव्हायरसची लक्षणे सामान्यतः संसर्गानंतर 12 ते 48 तासांनी दिसतात. बहुतेक लोक 1-3 दिवसात बरे होतात. परंतु ते काही दिवस संसर्गजन्य राहतात. (Covid's JN.1 Variant in Maharashtra: 'कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नाही', मात्र कोविड अनुरूप नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे राज्य सरकारचे आवाहन)

नोरोव्हायरस कसा पसरतो?

संक्रमित व्यक्तीची विष्ठी किंवा उलट्यांमध्ये सोडलेल्या लहान कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. नोरोव्हायरस संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून पसरतो. म्हणजे संक्रमित व्यक्तीची भांडी वापरल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या अन्नातून त्याचा प्रसार होतो. (Pigeons Give You Deadly Lungs: सावधान! कबुतरांमुळे पसरत आहेत घातक आजार; महिलेला करावे लागले फुफ्फुसाचे प्रत्यारोपण)

नोरोव्हायरस प्रसार कसा रोखावा?

अहवालानुसार, नोरोव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. हा व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी, साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. कपडे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. बाहेरचे अन्न खाणे टाळा.

CDC डेटानुसार, नोरोव्हायरसमुळे यूएसमध्ये दरवर्षी सुमारे 19 ते 21 दशलक्ष आजार होतात. ज्यामध्ये संक्रमणाची सर्वाधिक प्रकरणे नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत आढळतात. दरवर्षी, नोरोव्हायरसमुळे सुमारे 109,000 रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. तसेच या विषाणूमुळे आतापर्यंत 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.