ब-याचदा आपल्याला लोकांकडून असं ऐकायला मिळतं आमच्या घरात किंवा मी कुठेही गेलो तरी मलाच जास्त डास चावतात. आपल्यासोबत असलेल्या इतरांना डास न चावता मलाच का नेहमी डास (Mosquito) चावतात असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. कदाचित आपले रक्त शुद्ध असावे असे सांगत आपण या गोष्टीला हसण्यावरी नेतो. हा प्रश्न देखील हास्यास्पद असला तरी विचार करण्यासारखा आहे.
सर्वेनुसार असे सांगण्यात येत आहे की आपल्यापैकी 20 टक्के लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात. याला काही शास्त्रीय कारणे आहेत. जाणून घ्या ती 5 कारणे ज्या माणसांना जास्त डास चावतात.
1. रक्तगट:
असे म्हणतात की मादी डास अंडे देण्यासाठी मनुष्यांच्या रक्तातील प्रोटीन मिळवतात. डासांसाठी रक्त हे अमृत असते. त्यामुळे त्याने वेगवेगळे रक्तगटही गरजेचे असतात. त्यामुळे O आणि A रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात. तर B रक्तगट असलेल्या लोकांना सामान्य रुपाने चावतात.
2. गडद रंगाचे कपडे परिधान करणा-या लोकांना:
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, डासांची नजर फार चांगली असते. त्यामुळे जर तुम्ही गडद रंगांचे कपडे परिधान केले असतील तर तुम्हाला डास सहजरित्या शोधतात.
हेदेखील वाचा- Monsoon Tips: पावसाळ्यात डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात ही 5 झाडं लावणं ठरेल फायदेशीर
3. कार्बन डाय ऑक्साइड गॅस करते आकर्षित:
या गॅसकडे डास मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. मनुष्य हा ऑक्सिजन शरीरात घेऊन कार्बनडाय ऑक्साइड बाहेर सोडतो. याच कारणामुळे डास हे मनुष्यांच्या नाकाजवळ जास्त फे-या मारतात.
4. गर्भवती महिला:
गर्भवती महिला एका सामान्य महिलेपेक्षा जास्त कार्बनडाय ऑक्साइड बाहेर सोडते. त्यामुळे गर्भवती महिलांकडेही डास जास्त आकर्षित होतात.
5. घाम:
गरमीच्या दिवसात शरीरातून निघणा-या घामातून लॅक्टिक अॅसिड, युरिक अॅसिड आणि अमोनिया हे घटक डासांना आकर्षित घेतात. म्हणून ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना डास्त जास्त चावतात.
ही लक्षणं ज्या लोकांमध्ये असतात त्यांना सर्वसाधारणपणे इतरांच्या तुलनेत जास्त डास चावतात. त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी