Monsoon Hair Care Tips: महाराष्ट्रात मान्सूनचं (Monsoon) आगमन झालं आहे. मान्सूनचा पहिला पाऊस पडला की, सर्वांनाचं पावसात भिजण्याची इच्छा होते. पहिल्या पावसाचा आनंद सर्वांनाचं हवा-हवासा असतो. मात्र, पावसात भिजल्याने आपल्याला थोड्याफार प्रमाणात नुकसानही सहन करावं लागतं.
पावसात भिजल्याने केसांचे सौंदर्य (Beauty Of Hair) बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण या लेखातून पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - Health Tips: घर ते ऑफिस प्रवासादरम्यान कोरोना व्हायरस चा संसर्ग टाळण्यासाठी घ्या 'ही' काळजी)
- सर्वात प्रथम म्हणजे पावसाळ्यात घराबाहेर पडताना केस भिजणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच पावसाळ्यात वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणं टाळा.
- पावसात भिजल्यानंतर केस तसेच न वाळवता कोमट पाण्याने धुवा. पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या केसातं बॅक्टेरिया आणि फंगल इन्पेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस कोमट पाण्याने धुवून योग्यरित्या कोरडे होऊ द्या.
- केस धुण्यासाठी शाम्पूचा वापर करा. पावसाळ्या आठवड्यातून दोन वेळा केस धुऊन एकदा कंडिशनर करावेत.
- पावसाळ्यात हेअर स्टाईलिंग प्रोडक्टचा वापर करणं टाळा. पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणे तसेच सतत आयनिंग करणं टाळा.
- पावसाळ्यात केस ओले झाल्यास मोठ्या दातांचा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा. त्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत.
- पावसाळ्यात वातावरणातील ओलावा, आर्द्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे आठवड्यात दोन वेळा केस धुवावेत.
पावसाळा आपल्या बरोबर अनेक आजारांना घेऊन येत असतो. त्यामुळे या दिवसांत केस, त्वचा आणि एकूणचं आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात केस सतत भिजण्याची भीती असते. त्यामुळे यादिवसांत केस व्यवस्थित धुऊन स्वच्छ कोरडे करणं विसरू नका.