
सकाळच्या सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत आपली कामे काही संपता संपत नाहीत. त्यात जर एखादी व्यक्ती धावपळ करत ऑफिसला जाण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याच्या आरोग्यावर कालांतराने परिणाम होत असल्याचे दिसून येते. तसेच ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढल्याने सुद्धा व्यक्तीची चिडचिड झाल्याचे दिसून येते.
काही वेळेस ऑफिसची कामे सुद्धा घरुन करावी लागतात. त्यामुळे व्यक्तीच्या डोक्यात वारंवार ऑफिसबद्दलच्या त्याच गोष्टी सुरु असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा डोक दुखते, अस्वस्थ वाटते. तर ऑफिसच्या कामाच्या ताणापासून दूर राहण्यासाठी 'या' गोष्टी जरुर करा. असे केल्याने आरोग्यासंबंधित समस्या दूर राहण्यास मदत होईल.
एखादा छंद असल्यास त्यासाठी वेळ काढा.
>दिवसातील कमीतकमी एक तास घराबाहेर एकट्यात वेळ घालवा किंवा मैदानी खेळ खेळा.
>मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जा.
>ऑफिसच्या कामाचा सातत्याने विचार करत राहू नका.
>दिवसातून एकदातरी मेडिटेशन करा. त्यामुळे मनावर ताण निर्माण करणारे विचार दूर होण्यास मदत होईल.
(तुमचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी मदत करेल गोड 'बडीशेप', वाचा गुणकारी फायदे)
या गोष्टी केल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच ऑफिसच्या कामाचा ताण कमी झाल्याचे तुम्हाला जाणवेल. एवढचे नाही तर आपल्या परिवारासोबत थोडा वेळ घालवत तुम्हाला जाणवत असलेल्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करा.