Health Tips: शीघ्र कोपी लोकांनी रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्की ट्राय करा या '5' गोष्टी
Short Tempered Person (Photo Credits: pexels (representational Photo)

रोजच्या धावपळीचया जीवनामुळे, कौटुंबिक कलह आणि अन्य ताणतणावाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो. तसेच एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर अनेकांची चिडचिड होते. आणि अशा वेळी ती चिडचिड तो राग कुणा अन्य व्यक्तीवर आपण काढतो. अशा वेळी अनेकदा आपल्या तोंडून अपशब्द निघतात. ज्यामुळे कदाचित तुमचे समोरच्या व्यक्तीसोबत नातं तुटण्याची शक्यता असते. म्हणूनच अशा वेळी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असते. मात्र काही जण आपण Short Tempered म्हणजेच शीघ्र कोपी आहोत असे सांगतात.

शीघ्र कोपी म्हणजे एखाद्याला खूप पटकन राग येतो आणि रागाच्या भरात ते समोरच्याला तर कधी कधी स्वत:ला इजा पोहोचवतात. असा स्वभाव असलेल्या लोकांना म्हणावे तितके सोपे नाही. त्यामुळे अशा लोकांनी स्वत:च्या रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी नक्की ट्राय केल्या पाहिजे.

1. राग आला की 100 पासून उलटे अंक किंवा 10 पासून उलटे पाढे म्हणायला सुरू करा. राग कमी होईल.

2. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते मेडिटेशन. अगदी सोपी पद्धतंही तुम्ही अवलंबू शकता. आपल्या श्वासावर लक्ष नियंत्रित करून 10 मिनिटं शांत बसणं. यामुळे आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. Health Tips: स्नायूंना आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी हे '5' आयुर्वेदिक तेल ठरतील गुणकारी

3. रिलॅक्सेशन थेरपी

रागावर नियंत्रण आणण्याचा सोपा मार्ग म्हणजे दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. असे 10 वेळा करा. त्यामुळे तुमचे मन शांत होते

4. राग आल्यानंतर गाणी तुमच्या आवडीची गाणी ऐका किंवा मनातल्या मनात ते गुणगुणा. याने तुमचं रागावरचं लक्ष विचलित होईल. Health Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी

5. खुर्चीवर बसा किंवा जमिनीवर झोपा. तुमच्या पोटाच्या होणाऱ्या हालचालीकडे 3-5 मिनिटे लक्ष द्या. त्यावेळेस दीर्घ श्वास घ्या.

सतत चिडचिड आणि राग तुमच्या मनावर, शरीरावर आणि परिणामी दिनचर्या आणि कामावर परिणाम करणारा असतो. अशा वेळी रोज व्यायाम, योगासनं आणि योग्य आहार झोप घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहतं.