पुणे: नोकरीवरुन काढल्याच्या रागामुळे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्येच लावला गळफास
Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) येथील एका तरुणाने नोकरीवरुन काढून टाकल्याच्या रागात चक्क ऑफिसात गळफास लावत आयुष्य संपवले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट सुद्धा केली होती.

सुंदर गोरटे असे मृत तरुणाचे नाव आहे. सुंदर याने आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री फेसबुकवर नोकरीवरुन कशा पद्धतीने काढून टाकले याबाबत पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये सुंदर याने नोकरीच्या ठिकाणची मंडळी दबाब टाकत असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीतून काढून टाकल्यास आत्महत्या करणार असल्याचे ही त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.(भिवंडी: अतिदक्षता विभाग ठेवलेल्या रुग्णाजवळ गर्दी करु नका, संतापलेल्या नातेवाईकांनी केली डॉक्टरला मारहाण) 

तसेच पोस्टच्या शेवटी अश्विनी मला माफ कर असे सुद्धा लिहिले होते. परंतु ही पोस्ट काही वेळानंतर फेसबुकवरुन डिलीट करण्यात आली होती. यामुळे सुंदर याने आत्महत्या केली की यापाठी अजून दुसरे काही कारण आहे का याबद्दल अधिक तपास केला जात आहे. परंतु पोलिसांनी सुंदर याची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.