वाढत्या वयामुळे वजन वाढण्याची समस्या भेडसावू लागते. तसेच आहारातील बदल आणि जीवनशैलीचा परिणामसुद्ध आरोग्यावर होतो. यामुळे विविध आजारसुद्धा होण्याची शक्यता असते. तर वाढत्या वयामुळे थकवा फार प्रमाणात जाणवू लागतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.
वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. मात्र वाढत्या वयामुळे थकवा जाणवू लागल्याने चालण्यासाठी सुद्धा त्रास होतो. तर बऱ्याच वेळा चाळीशीनंतर एकापाठून एक आजार उद्भवतात असे म्हटले जाते. त्यामधील मुखत्वे म्हणजे वजन नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे जर तुम्हाला चाळीशीनंतरुसद्धा वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास हे उपाय करा.
-अक्रोडमध्ये असणारे प्रोटीन आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे शरीर सडपातळ होण्यास मदत होते.
-काळ्या सोयाबीनचे सेवन केल्याने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता दूरावते. तसेच शरीराची चरबी वेगाने कमी होते.
-खजुबूज मध्ये 45 कॅलरी असल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-कोबीच्या पानांचा सर प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचसोबत आहारात हिरव्या भाजांचा समावेश केल्याने 10 टक्के कॅलकी कमी होते.
(तुम्ही जास्तवेळ Earphones लावून गाणी ऐकता? वेळीच काळजी घ्या नाहीतर 'या' गंभीर आजारांना बळी पडाल)
त्यामुळे वय जसेजसे वाढते त्यानुसार विविध आजार बळावू लागतात. तसेच स्नायूसुद्धा कमजोर होतात. त्यामुळे आरोग्याला विविध प्रोटीनची गरज अत्यावश्यक असते. मात्र प्रोटीनचे सेवन करताना त्यानुसार आपले वजन किती नियंत्रात आहे हे कळून येते.
-