बहुतांश लोक वेळ जात नाही म्हणून कानाला इअरफोन्स लावून मोबाईलवर तासतासभर गाणी किंवा व्हिडिओ पाहत राहतात. तर व्हिडिओ किंवा गाण्याचा आवाजसुद्धा नीट ऐकू येण्यासाठी त्याचा आवाज अधिक वाढवला जाते. मात्र जर तुम्ही जोरात आवाजातइअरफोन्स लावून गाणी ऐकत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण जोराच्या आवाजात गाणी ऐकल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
इअरफोन्स लावून गाणी ऐकल्याने फक्त कानासह त्याचा आरोग्याला त्रास होते. इअरफोन्समुळे गाणी ऐकणे सोपे असले तरीही त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास 'या' गंभीर आजारांना तुम्ही बळी पडू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि इअरफोन्सचा वापर सातत्याने करणे टाळा.
-बहिरेपण
एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, एखादी व्यक्ती दोन तासांपेक्षा अधिक वेळ आणि 90 डेसिबलहून ही अधिक आवाजात गाणी ऐकत असेल त्याला बहिरेपण येण्याची शक्यता फार असते. त्यामुळे बहिरेपण आल्यास तुम्हाला समोरच्या व्यक्तीने काय म्हटले आहे ते तुम्हाला 40 ते 50 डेसिबलच्या क्षमतेत ऐकू येते. तसेच व्यक्तिला लांबचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही.
-हृदयाचे आजार
जोरजोराच्या आवाजात गाणी ऐकल्याने व्यक्तींच्या कानावरच नाही तर हृदयावरसुद्धा त्याचा परिणाम होते. उच्च प्रमाणाच्या आवाजातील गाण्यांमुळे हृदयाचे ठोके जलद होतात. या गोष्टीमुळे तुमच्या हृदयाला त्रास होऊन त्यासंबंधित आजार होण्याची शक्यता असते.
-डोके दुखणे
इअरफोन्स कानातून गाणी ऐकून झाल्यावर काढून टाकल्यास त्यामधील चुंबकीय लहरींचा परिणाम व्यक्तीच्या मेंदूवर होते. त्यामुळेच व्यक्तीला डोके दुखी किंवा झोप न येण्याची समस्या भेडसावत राहते.(छोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा!)
त्यामुळे इअरफोन्स जास्त वेळ लावून गाणी ऐकण्याची सवय महागात पडू शकते. तसेच कान दुखीच्या तक्रारीपासून दूर रहायचे असल्यास इअरफोन्स गरज असेल तेव्हाच कानाला लावा. या सगळ्या गोष्टींत मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे इअरफोन्स हे उत्तम दर्जाचे विकत घ्या.