Health Benefits Of Walnuts (PC - Pixabay)

अक्रोड (Walnuts) हा सुकामेव्यातील एक असा प्रकार आहे ज्यात केक, चॉकलेट्स, लाडू, आईस्क्रिम यांसारख्या पदार्थांमध्ये अनेकदा वापर केला जातो. अक्रोडमध्ये अँटी ऑक्सिडंट सारखे पोषक घटक असल्यामुळे शरीरास त्याचे आरोग्यदायी असे फायदे होतात. हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी, वजन नियंत्रणात आणण्यासाठी, मेंदूचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी अक्रोड खाणे फायद्याचे ठरते. मात्र हे अक्रोड किती प्रमाणात आणि कोणी खावे हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नाहीतर शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

अक्रोड जास्त प्रमाणात खाल्ल्याने अंगावर पित्त येणे, खाज सुटणे, पुरळ येणे असे आजार देखील अनेकांना उद्भवू शकतात. त्यामुळे अक्रोड खाण्याचे प्रमाण हे नियंत्रित असावे. त्याबाबत जाणून घ्या सविस्तर

अक्रोड खाण्याचे प्रमाण किती असावे?

दिवसभरात मूठभर अथवा 4 ते 5 अक्रोड खाण्यास काही हरकत नाही. मात्र त्याहून अधिक प्रमाणात अक्रोड खाल्ल्यास तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.हेदेखील वाचा- Health Benefits Of Sabja Seeds: वजन कमी करण्यापासून, त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे सब्जा; जाणून घ्या 'हे' महत्वाचे फायदे  

अक्रोड कुणी खाऊ नये?

ज्यांची त्वचा खूप संवेदनशील असेल, अशांनी अक्रोड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा लोकांना पित्ताचा त्रास उद्भवू शकतो. तसेच अंगावर पुरळ वा खाज येण्यासारखे प्रकार देखील घडू शकतात.

अक्रोड खाण्याची योग्य पद्धत

अक्रोड रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी दूधासोबत खाल्ल्यास शरीरास चांगला फायदा होता.

त्यामुळे तुम्ही जर अक्रोड खाण्यास सुरुवात करणार असाल तर या गोष्टी नक्की पडताळून पाहाव्यात. तुमच्या शरीरास अक्रोड हितवर्धक आहे की नाही याची आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन खात्री करुन घ्या.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)