Health Tip: तिखट खाताना अशक्तपणा का जाणवतो?
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Health Tip: आपले वाडवडिलांनी सांगितले आहेच "अती तेथे माती व थोड्यात गोडी." याचाच अर्थ असा कोणतीही गोष्ट आपल्याला झेपेल इतपत केली तर त्रास होत नाही.मसालेदार, चमचमीत पदार्थ वारंवार खाण्यात आल्यावर शरीरास अपायकारक असते.आपण उष्ण कटिबंधीय प्रदेशात राहतो.उष्ण हवामानामुळे शरीरास आणखी उष्ण पदार्थ खाण्याची फारशी गरज नसते. जे लोक भरपूर कष्ट करतात ते तिखट खाउ शकतात. बाकीच्यांना तशी गरज नसते. आपण बरेच जण झणझणीत चमचमीत खायचे म्हणून खातो. तेव्हा असे पदार्थ खाताना तारतम्य बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

तिखट खाताना अशक्तपणा जाणवतो याचाच अर्थ असा आहे कि आपली पचनशक्ती कमी झाली आहे. तिखटामुले आपल्या जठराची अंतरतवचा नाजूक झाल्याने तिचा दाह होत असेल. त्यामुळे आपणास अशक्तपणा जाणवत असेल. वेळीच सावध न झाल्यास आपणास पित्ताचा त्रास होऊ शकतो. पुढील पायरी म्हणजे अल्सर (जठराच्या अंतरतवचेला जखमा होणे.)होऊ शकतो.तरी आपण याबाबत वैद्यकीय सल्ल्यानुसार वागणे उचित ठरेल.(Genes सांगू शकतात चिंता आतड्यांच्या विकाराशी का संबंधित आहे, संशोधन अहवाल)

आता मिरचीविषयी, मिरची हा पदार्थ सोळाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांनी आणला.त्याआधी आपण खाण्यात मिरीचा वापर करायचो.मिरीचा तिखटपणा तुलनेने मिरची पेक्षा कमी आहे पण मिरीचे पिक काढणे जास्त कष्टाचे असून तुलनेत मिरची पेक्षा कमीच मिळते.मिरचीला मेहनत कमी,निगा घेण्याची गरज कमी व उत्पन्न जास्त. तसेच तिखट पणादेखील जास्त यामुळेच मिरचीचा वापर भारतात वाढताच राहीला आहे. याशिवाय बटाटा, शेंगदाणा, साबूदाणा, काजू असे अनेक पदार्थ पोर्तुगीजांनी भारतात आणलेले आहेत.