Best Weight Loss Drinks: सध्याच्या धावपळीच्या जीवनात वाढलेलं वजन ही समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अनेकदा पुरेसा व्यायाम करूनही वाढलेलं वजन किंवा पोटोचा घेर कमी करणं शक्य होतं नाही. वाढलेले पोट कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगासने बरोबरच खाण्याच्या योग्य सवयी पाळणे आवश्यक आहे. तरच तुम्ही निरोगी शरीर राहू शकाल. यासाठी आम्ही तुम्हाला 5 हेल्दी ड्रिंक्सबद्दल (Healthy Drinks For Weight Loss) सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील चरबी वेगाने वितळते.
हे सुपर ज्यूस तुम्ही अगदी कमी वेळत घरात बनवू शकता. हे ज्यूस प्यायल्यानंतर तुमच्या शरीरातील चरबी पाण्याप्रमाणे वितळून जाईल. तसेच अत्यंत कमी दिवसांमध्ये तुम्हाला याचे परिणामही दिसून येतील. चला तर मग या ज्यूसची रेसिपी आणि त्यांचे गुणधर्म जाणून घेऊयात...(हेही वाचा - Effective Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी प्रभावी टीप्स)
लिंबू आणि आल्याचा रस
लिंबू आणि आले यांचे मिश्रण सेवन केल्याने चयापचय वाढतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. लिंबू आपल्या शरीरात डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. हे ज्यूस करण्यासाठी 1 ग्लास पाणी, 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट पाण्यात टाका. हे मिश्रण चांगले मिसळा आणि रोज सकाळी प्या. यामुळे तुम्हाला नक्कीचं परिणाम दिसून येतील. (हेही वाचा, Australian Nurse Weight Loss: ऑस्ट्रेलियन नर्सने घटवले 45 Kg वजन; साध्या व्यायाम करत वापरली युक्ती)
काकडीचा रस -
हा रस तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. काकडीचा रस शरीराला हायड्रेट ठेवतो. तसेच या ज्यूसमध्ये खूप कमी कॅलरी असतात. जर तुम्ही काकडीचा रस नियमितपणे प्यायला तर शरीरातील चरबी नक्कीच कमी होण्यास मदत होते. हा रस बनवण्यासाठी काकडी नीट धुवून, सोलून त्याचे तुकडे करून रस काढा. (हेही वाचा: Protein Supplements Mislabeled In India: सावध रहा! भारतात उपलब्ध असलेल्या 70 टक्के प्रोटीन सप्लिमेंट्सचे लेबल चुकीचे; सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक सत्य)
कारले आणि मेथीचा रस -
कारले आणि मेथीचा रस देखील तुमचे चरबीयुक्त पोट कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हे तुमचे चयापचय मजबूत करण्यासाठी चांगले कार्य करते. हे ज्यूस शरीरात जमा झालेली चरबी वेगाने वितळवण्याचे काम करते. हे करण्यासाठी अर्धा कारला आणि 1 चमचा मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचा रस तयार करा.
ग्रीन टी -
सकाळी ग्रीन टीमुळे तुमची चयापचय क्रियाही वाढते. आजकाल ग्रीन टी ही फिटनेस प्रेमींची पहिली पसंती आहे. यामुळे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी वेगाने वितळते. त्यात कॅफिनचे प्रमाण कमी असते. अशा परिस्थितीत याचा तुमच्या झोपेवर परिणाम होत नाही ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता.
माची चहा -
माची चहा तुमच्या शरीरातील चरबी वेगाने वितळण्यास मदत करतो. त्याला जपानी ग्रीन टी असेही म्हणतात. त्यातील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात. तुमचे वजन कमी करण्यासोबतच ते तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदेही देते.
Disclaimer: वरील मजकूर हा केवळ सामान्य माहिती प्रदान करतो. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेटेस्टली मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.