WHO कडून अलर्ट! लस घेतलेल्यांना सुद्धा Delta Plus वेरियंचा धोका, जाणून घ्या लक्षणे
Archived, edited, symbolic images

कोरोनाचे संकट अद्याप कायम असून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत नाही आहे. मात्र कोरोनाचे विविध वेरियंट सध्या समोर येत आहेत. अशातच आता कोरोना व्हायरसचा नवा वेरियंट डेल्टा प्लस  (Delta Plus) आता भारतासह जगभरात चिंतेचे कारण ठरले आहे. आता पर्यंत जवळजवळ 85 देशांमध्ये या घातल डेल्टा प्लस आढळून आला आहे.याच कारणास्तव आता WHO कडून डेल्टा प्लस हा अत्यंत धोकादायक आणि संक्रमण होणारा वेरियंट असल्याचे म्हटले आहे. हा वेरियंट लस घेतलेल्यांना सुद्धा आपले शिकार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे डब्लूएचओ कडून या वेरियंटबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.(COVID 19 Vaccine FAQs: कोविड 19 लसींमुळे वंध्यत्व येते का ते भविष्यात बूस्टर डोस घेण्याची वेळ आली तर तीच लस घ्यावी लागते का? पहा तुमच्या मनातील लसीकरणाबाबतच्या प्रश्नांची एक्सपर्ट उत्तरं)

शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत डब्लूएचओचे डायरेक्टर जनरल यांनी असे म्हटले की, मला माहिती आहे सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरियंटमुळे चिंतेत आहे. पुढे असे म्हटले की, डब्लूएचओ सुद्धा याच वेरियंटमुळे चिंता व्यक्त करत आहे. ट्रेडस अधनोम यांच्यानुसार डेल्टा अत्यंत संक्रमक वेरियंट आहे. जो आतापर्यंत 85 देशांमध्ये पसरला गेला आहे. मुख्य बाब अशी की, लस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा फटका बसत आहे. तर जाणुन घ्या डेल्टा प्लसची लक्षणे.(Covid-19 Vaccine for Pregnant Woman: कोविड-19 लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित- ICMR)

-डेल्टा प्लसची लक्षणे ही कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांपेक्षा वेगळी आहेत.

-डेल्टा प्लसमध्ये व्यक्तीची ऐकण्याची क्षमता कमी होणे

-पोटात गडबड

-गँग्रीन सारखी लक्षणे

-रक्ताच्या गुठळ्या तयार होणे

ट्रेडस यांनी असे म्हटले की, डेल्टा वेरियंटमुळे संक्रमित होण्याची शक्यता अधिक आहे. याच प्रकारचे वेरियंट आपोआप विकसित होत असतात. मात्र संक्रमणावर ब्रेक लावून नवा वेरियंट तयार होण्यास थांबवू शकतो. तर डब्लूएचओच्या कोविड टेक्निकल लीड डॉ. मारिया वॅन करखोव यांच्या मते, डेल्टा कोरोना पेक्षा अत्यंत अधिक धोकादायक वेरियंट आहे. तो अल्फा वेरियंट पेक्षा सुद्धा अधिक संक्रमक असून तो जगभरात त्याच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.