Healthy Air-mmunity Boosting Room Freshener: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुण्याच्या DIAT ने विकसित केले इम्युनिटी ब्युस्टर  Healthy Air रुम फ्रेशनर
Healthy Air Room Fresheners (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हीच बाब लक्षात घेत हर्बल बेस्ड (Herbal-Based) इम्युनिटी ब्युस्टर (Immunity-booster) रुम फ्रेशनर (Room Freshener) लॉन्च करण्यात आले आहे. पुण्याच्या प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी  इम्युनिटी ब्युस्टर रुम फ्रेशनर विकसित केले आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defence) देण्यात आली आहे. हे रुम फ्रेशनर नीम, निलगिरी, कॉम्फर, दालचिनी, तुळस, लिंबू, हळद, लवंग, ओवा, लव्हेंडर, इलायची यांसारख्या विविध हर्बल ऑईल एक्सट्रॉक्टमधून बनवण्यात आले आहे. (येथे पहा देशातील कोरोना बाधितांची आकडेवारी)

या रुम फ्रेशनरमध्ये हर्बल ऑईल असल्याने ते इम्युनिटी ब्युस्टर म्हणून काम करते. यात अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल तसंच कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. हे प्रॉडक्ट पूर्णतः हर्बल असून यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. तसंच यात कोणत्याही प्रकारच्या विषारी द्रव्यांचा वापर केलेला नाही.

ANI Tweet:

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हेल्थी एअर रुम फ्रेशनर हवेतील विषारी घटक दूर करुन हवा शुद्ध करतात. यात ताण, चिंता दूर करण्याची क्षमता आहे. तसंच यामुळे श्वसनासंबंधित आजारावर उपचार होण्यास मदत होते. यात हर्बल आईलचा अर्क असल्यामुळे नैसर्गिक जंतुनाशकं म्हणून देखील याचा वापर केला जातो. मात्र याचा मानवी शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्याचबरोबर रुम फ्रेशनर म्हणून त्याचा चांगला वापर होतो.